26/11 Attack: २६/११ हल्ल्याला उद्या १५ वर्ष पूर्ण; अद्यापही समुद्र सुरक्षेबाबत सरकार गंभीर नाही?

26/11 Attack Sea Safety: समुद्रमार्गे झालेल्या या हल्यानंतर मुंबईच्या २४ तास सुरक्षेसाठी सरकारने ४६ बोटी विकत घेतल्या होत्या. त्यातील आज फक्त ८ बोटी कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
2008 Mumbai Attacks
2008 Mumbai AttacksSaam TV

26/11 Attack:

मुंबईत २००८ साली झालेल्या २६/११ च्या हल्याला उद्या १५ वर्ष पूर्ण होत आहेत. २००८ साली लष्कर ए तोयबाच्या या दहशतवादी हल्यात १६० लोकांचा जीव गेला होता. तर ३०० नागरिक जखमी झाले होते. या घटनेच्या १५ वर्षानंतरही समुद्र सुरक्षेबाबत सरकार गंभीर नसल्याचे दिसून येतेय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

2008 Mumbai Attacks
Crime News: सावधान! आपल्या आसपास फिरतायेत विकृत प्रवृत्तीचे गुन्हेगार, पोलिसांकडून छायाचित्र प्रसिध्द

समुद्रमार्गे झालेल्या या हल्यानंतर मुंबईच्या २४ तास सुरक्षेसाठी सरकारने ४६ बोटी विकत घेतल्या होत्या. त्यातील आज फक्त ८ बोटी कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, यातील अनेक बोटी धूळखात पडल्या असून सरकारकडे आता २२ नव्या बोटींसाठी प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती मिळते.

सुरक्षेसाठी घेतलेल्या या ३ डझनहून अधिक बोटी आता मोडकळलेल्या अवस्थेत माझगावच्या "लकडी बंदर" येथे टेकू लावून उभ्या आहेत. २००८ च्या हल्यानंतर समुद्र सुरक्षेबाबत सरकारने पाऊले उचलत या घटनेच्या चौकशीसाठी प्रधान समितीची स्थापना केलीये. या प्रधान समितीच्या अहवालानंतर समुद्र सुरक्षेबाबत पुढील ३ वर्षात ४६ गस्ती बोट खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

त्यात २३ स्पीड बोट, १९ बोटी ज्या पाणी आणि समुद्र किनारी अशा दोन्ही ठिकाणी धावू शकतात. यातील आज फक्त ८ स्पीड बोट कार्यरत असून उर्वरित १९ दोन्ही ठिकाणी चालणाऱ्या बोटी आणि ४ सिलेग बोटी या निकामी झाल्या आहेत. न्यूझीलंडहून या सी लेकबोटी खरेदी केल्या होत्या, आधुनिक असलेल्या या बोटींचा दुरूस्ती खर्चही जास्त असल्याने बहुताळ बोटी धूळखात पडून आहेत.

ज्या २३ स्पीड बोटी होत्या त्यातील १९ बोटींचे इंजीन दुरूस्तीच्या वेळी कंत्राटदारांनी बदलून कमूवत इंजिन बोटीला बसवण्यात आलं, ही घटना समोर आल्यानंतर पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. समुद्र सुरक्षेसाठी पोलिसांच्या मोटर वाहन विभागाने आता २२ नव्या बोटींच्या खरेदीचा प्रस्ताव सरकारने दिला आहे. याचबरोबर जुन्या बोटीचे आधुनिकीकीकरण, नव्या जेट्टी उभारणे, प्रशासकिय इमारत याबाबत प्रस्ताव सरकार दरबारी दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

2008 Mumbai Attacks
Lalit Patil Crime News: ड्रग्जमाफीया ललित पाटीलसह चार जणांना न्यायालयीन कोठडी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com