MPSC Exam: MPSC च्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देतो सांगणारा पोलिसांच्या जाळ्यात, ४० लाखांची केली होती मागणी

MPSC exam Question Paper: एमपीएससीकडून महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेची प्रश्नपत्रिका देतो सांगत ४० लाखांची मागणी करण्यात आली होती.
MPSC Exam: विद्यार्थ्यांमध्ये खळबळ! ४० लाख रुपये द्या, प्रश्नपत्रिका देतो; विद्यार्थ्यांना फोन, पुण्यात खळबळ
MPSC ExamsSaam tv
Published On

सचिन जाधव, पुणे

एमपीएससी ऑडिओ क्लिपबाबत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. या दोघांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या रात्री प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवले होते. प्रश्नपत्रिका देण्यासाठी त्यांनी ४० लाखांची मागणी केली होती. या फोन कॉलमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्य्ये खळबळ उडाली होती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीकडून महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी असणारी प्रश्नपत्रिका आदल्या रात्री उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थ्यांना आमिष दाखवणारे फोन आले होते. या एका फोनची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. फोन करणाऱ्यांनी प्रश्नपत्रिकेसाठी विद्यार्थ्यांकडे ४० लाखांची मागणी केली होती. या फोन कॉलमुळे नोकर भरतीमध्ये मोठा घोटाळा होण्याची चर्चा रंगली होती.

MPSC Exam: विद्यार्थ्यांमध्ये खळबळ! ४० लाख रुपये द्या, प्रश्नपत्रिका देतो; विद्यार्थ्यांना फोन, पुण्यात खळबळ
Pune Crime News: पुण्यात उडता पंजाब! २५ लाख रूपयांचे अंमली पदार्थ जप्त, उच्चभ्रू परिसरात मोठी कारवाई

याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे पोलिसांना याप्रकरणाचा तपास करण्यात यश आले आहे. याप्रकरणी पुणे जिल्ह्यातल्या चाकणमधून दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

या फोन कॉलद्वारे 'नमस्कार सर मी रोहन कन्सल्टन्सी नागपूरमधून बोलत आहे. आपले बोलणे झाल्याप्रमाणे आपण महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पुर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेचा पेपर आम्ही आपणास उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक व्हॉट्सअप कॉलवर एक मिटिंग करावी लागेल. त्यानंतर ठरल्याप्रमाणे होईल. असे संभाषण रेकॉर्ड झालेला महिलेच्या आवाजातील एक कॉल विद्यार्थ्याला आला आहे. असेच फोन इतर विद्यार्थ्यांना देखील आले होते.

MPSC Exam: विद्यार्थ्यांमध्ये खळबळ! ४० लाख रुपये द्या, प्रश्नपत्रिका देतो; विद्यार्थ्यांना फोन, पुण्यात खळबळ
Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची माहिती; गणेश जयंतीमुळे वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

आम्ही या परीक्षेची प्रश्नपत्रिका २ फेब्रुवारी पूर्वी उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी ४० लाख रुपये द्यावे लागतील. आपल्याला विश्वास नसेल तर या परीक्षेला एक ही रुपया नाही दिला तरी चालेल. फक्त आपले ओरिजनल कागदपत्रे जमा करावे लागतील. त्यानंतर मुख्य परीक्षेला देखील प्रश्नपत्रिका दिली जाईल. असे फोन कॉलद्वारे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते. त्यामुळे एमपीएसच्या विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली होती. या फोन कॉलची सत्यता पडताळण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांकडून एमपीएससीला अर्ज केला होता.

MPSC Exam: विद्यार्थ्यांमध्ये खळबळ! ४० लाख रुपये द्या, प्रश्नपत्रिका देतो; विद्यार्थ्यांना फोन, पुण्यात खळबळ
Pune Traffic changes : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल, काही रस्ते बंद, काही मार्गात बदल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com