Ramdas Athawale News : ...तर वेगळा विचार करावा लागेल; रामदास आठवलेंचा भाजपला थेट इशारा

Ramdas Athawale News in marathi : रामदास आठवलेंनी दोन जागांची मागणी केली आहे. 'सन्मान मिळाला नाही तर वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा रामदास आठवलेंनी भाजपला दिला आहे.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSaam tv

सचिन जाधव, पुणे

Ramdas Athawale on lok sabha :

लोकसभा निवडणुकीची सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यात महायुती, महाविकास आघाडीने काही जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये काही जागांवर तिढा कायम आहे. तर मनसेकडून महायुतीकडे काही जागांची मागणी होत आहे. त्यानंतर आता रामदास आठवलेंनी दोन जागांची मागणी केली आहे. 'सन्मान मिळाला नाही तर वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा रामदास आठवलेंनी भाजपला दिला आहे. (Latest Marathi News)

पुण्यात आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आज रिपब्लिकन पक्षाची महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. रामदास आठवले म्हणाले,' लोकसभेच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्षाचे नाव कुठे येत नाही. नव्याने आलेल्या पक्षांना महत्व दिले जात आहे. रिपब्लिकन पक्षाला महत्व दिले जात नाही. अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. आम्ही दोन जागा मागितल्या आहेत. सोलापूर आणि शिर्डी या दोन जागा आम्हाला द्यायला हव्यात, अशी आमची मागणी आहे'.

Ramdas Athawale
CM Eknath Shinde यांनी घेतली खासदार हेमंत गोडसेंची भेट, नाशिकमधून उमेदवारीसाठी प्रयत्न? Marathi News

रामदास आठवले पुढे म्हणाले, 'काँग्रेस, इंडिया आघाडीचे १२ वाजवायचे म्हणून भाजपसोबत आहोत. आम्हाला २ जागा हव्यात. शिर्डी मिळाली तर मी उत्सुक आहे. तसेच सोलापूरही मिळावी ही देखील इच्छा आहे. आमच्या नेत्यांनी भाजपसोबत चर्चा केली, पण जागावाटपात आमचं नाव येत नाही. नव्यांचं नावं येतंय, पण जुन्यांचं येत नाही. महायुती आरपीआयने पाठिंब्यामुळे झाली'.

'रिपब्लिकन पक्षाकडे लक्ष दिलं जात नाही ही कार्यकर्त्यांची भावना आहे. सन्मान मिळावा ही अपेक्षा आहे. २ जागा द्यावा ही आमची आग्रही मागणी आहे. मी लवकरच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. केंद्रात १ मंत्रीपद मिळावं. राज्यात १ मंत्रीपद मिळावं. २ महामंडळ मिळावं. कार्यकर्त्यांना संधी मिळावी. १ विधानपरिषद मिळावी. तसेच विधानसभेच्या १०-१५ जागा मिळाव्यात, अशी मागणी आठवलेंनी केली.

Ramdas Athawale
Madha Lok Sabha Election 2024 :'माढा'त ट्विस्ट, धैर्यशील माेहिते पाटील गटाच्या गळाला लागण्यापूर्वी भाजप नेत्याची फडणवीसांकडून मनधरणी

'जर सन्मान मिळाला नाही तर वेगळा विचार करावा लागेल. आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही. जागावाटपाबाबत भाजपकडून चर्चा केली जात नाही. मी महायुतीकडून निवडून येईल ही खात्री आहे. शिर्डीतील जनतेची माझ्या उमेदवारीसाठी आग्रही मागणी आहे, असेही ते पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com