

मुंबई: देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर केंद्र सरकारने अचानक इंधन दरवाढ केली. यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस यांचाही समावेश आहे. काल (मंगळवारी) घरगुती गॅस सिलेंडरचे (Domestic LPG Gas Cylinder) दर 50 रुपयांनी वाढले असून सध्या देशात घरगुती गॅस सिलिंडरचे दर हे प्रती सिलिंडर 949.50 रुपयांवर गेले आहेत. यावरुन राष्ट्रवादीचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी (Smriti Irani) यांना खोचक टोला लगावला आहे. विशेष म्हणजे स्मृती ईराणी यांचा आज वाढदिवसही आहे, अमोल कोल्हेंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच त्यांना टोलाही लगावला आहे. (mp amol kolhe criticize minister smriti irani over LPG price hike)
हे देखील पहा -
खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, "स्मृती जी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. घरगुती गॅस प्रति सिलेंडर 1000 रुपयांच्या वर गेला आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे" असं म्हणत त्यांनी वाढलेल्या गॅसदराबाबत त्यांना टोला लगावला आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी या विरोधी पक्षात असताना त्यांनी घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं होतं. 1 जुलै 2010 ला कोलकाताचा मध्ये त्या भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा होत्या. स्मृती ईराणी आणि पश्चिम बंगालचे तत्कालीन भाजप प्रमुख राहुल सिन्हा एलपीजी सिलिंडरसह इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करत होते. यावेळी त्यांनी केंद्रातील कॉंग्रेस सरकारला धारेवर धरलं होतं, या आंदोलनातला त्यांचा फोटोही व्हायरल झाला होता.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही १३ फेब्रुवारी २०२० ला स्मृती ईराणींचा आंदोलनातील तो जुना फोटो ट्विट करत म्हटलं होतं की, "एलपीजी सिलिंडरच्या दरात १५० रुपयांची दरवाढ केल्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या भाजपच्या या सदस्यांसोबत मी सहमत आहे" असं ट्विट करत त्यांनी स्मृती ईराणी आणि भाजपला चिमटा काढला होता.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.