मुंबई पालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीसाठी हालचाली; युतीबाबत काँग्रेसमध्ये दोन प्रवाह

गेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा स्वतंत्रपणे लढले होते. शिवसेनेचे सद्याचे संख्याबळ 96 असून भाजपाचे संख्याबळ 82 इतके आहे. मनसेच्या सहा नगरसेवकांनी पाठराखण केल्यामुळे शिवसेनेला मोठे संख्याबळ मिळाले. या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी हा नवा जोडीदार शोधला असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई पालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीसाठी हालचाली; युतीबाबत काँग्रेसमध्ये दोन प्रवाह
मुंबई पालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीसाठी हालचाली; युतीबाबत काँग्रेसमध्ये दोन प्रवाह Saam TV
Published On

मुंबई : मुंबई महानगर पालिकेवर प्रशासकाची नेमणूक केल्यानंतर आता पालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. पालिकेच्या मुंबईतील विविध प्रकल्पांच्या संयुक्त पाहणी दौऱ्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा धुमधडाका सुरू झाला आहे. या पाहणी दौऱ्यात मुंबई महानगर पालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यात युतीच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा सुरू असून आता नवी राजकीय समिकरणे तयार होवू लागल्याचे दिसून येत आहे.

चैत्यभूमीजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्हुइंग डेक या पर्यटन स्थळाला आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदित्य ठाकरे (Ajit Pawar and Aditya Thackeray) यांनी भेट दिली. त्याच धर्तीवर मुंबईत मुंबईतील पातमुखांवर व्हयुइंग डेक उभारावेत असे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत. वरळी, महालक्ष्मी, हिलटॉप लेन आदी ठिकाणच्या विकास प्रकल्पांचीही त्यांनी पाहणी केली. या दोन्ही मंत्र्यानी एकाच वाहनातून प्रवास केला. त्या वाहनाचे सारथ्य आदित्य यांनी केले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Shivsena and NCP) यांच्यात पालिका निवडणुकीच्या निमित्ताने जवळीक वाढत आहे.

मुंबई पालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीसाठी हालचाली; युतीबाबत काँग्रेसमध्ये दोन प्रवाह
Aaditya Thackeray: गोव्याची शान धनुष्यबाण, पाहा आदित्य ठाकरे गोव्यात काय-काय म्हणाले?

शिवसेना-भाजपात मोठी दरी -

शिवसेना आणि भाजपा यांच्यात मोठी दरी निर्माण झाल्याने पालिका निवडणुकीत आता नवी राजकीय समीकरणे तयार होत आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा स्वतंत्रपणे लढले होते. शिवसेनेचे सद्याचे संख्याबळ 96 असून भाजपाचे संख्याबळ 82 इतके आहे. मनसेच्या सहा नगरसेवकांनी पाठराखण केल्यामुळे शिवसेनेला मोठे संख्याबळ मिळाले. या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी हा नवा जोडीदार शोधला असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सेनेसोबत लढल्यास राष्ट्रवादी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पिंपरी चिंचवड महानगर पालिका आणि मुंबई महानगर पालिका या दोन्ही महानगर पालिकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अंडरस्टॅंडिग होणार असल्याचेही बोलले जात आहे.

काँग्रेसमध्ये दोन प्रवाह -

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी पालिकेच्या निवडणुकीत एकला चलोरेची भुमिका घेतली आहे. मात्र काँग्रेसमध्ये या भुमिकेबाबत आंतरविरोध असून आघाडी करून निवडणुक लढवावी असा एक मतप्रवाह आहे. त्यामुळे या दोन प्रवाहांना सांभाऴून काँग्रेसला निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढविण्याची मागणीही होऊ लागली आहे. स्वतंत्र लढल्यास पक्षाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे काँग्रेस नगरसेवकांचे म्हणणे आहे तर युतीत लढल्यास कार्यकर्त्यांना न्याय देता येणार नाही असेही काही नेत्यांना वाटत आहे. काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू असल्याचे दिसत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com