Aaditya Thackeray: गोव्याची शान धनुष्यबाण, पाहा आदित्य ठाकरे गोव्यात काय-काय म्हणाले?

मंत्री आदित्य ठाकरे हे गोव्यात शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पोहोचले.
Aaditya Thackeray
Aaditya ThackeraySaam Tv
Published On

रश्मी पुराणिक -

Goa Elections 2022: गोवा: गोवा विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर आल्या आहोत. त्यासाठी सर्वच पक्ष प्रचारसभेत व्यस्त आहेत. आज शिवेसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे गोव्यात शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी स्थानिक भूमिपुत्रांना न्याय द्या, हेच शिवसेना प्रमुखांनी सांगितलं ते आपण करत आहोत. गोव्यात प्राधान्य स्थानिक गोवेकरांना देणार आहे, असं सांगितलं (Goa Assembly Elections 2022 Aaditya Thackeray Election Campaign).

Aaditya Thackeray
Amit Shah: अमित शाहांनी गोवा दौरा वाढवला, भाजपच्या बड्या नेत्यांची गोव्यात वर्दळ

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी 'जय गोमंतक'ची घोषणा देत भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, गेले दीड वर्ष सभा किंवा असं भेटायला मिळाले नाही. गेले एक दीड महिने बघत आहे. प्रचार फेऱ्या सुरु, केंद्रीय मंत्री राष्ट्रीय नेते येत आहेत. मला धाकधूक वाटते शिवसेना (Shivsena) प्रतिनिधी एक महिना प्रचार करतात ते परत येतील का असं वाटतं. गवि म्हणजे गोव्यात चाललो. प्रत्येक राज्याची वेगळी गोष्ट असते. स्थानिक भूमिपुत्रांना न्याय द्या, हेच शिवसेना प्रमुखांनी सांगितलं ते आपण करत आहोत. गोव्यात प्राधान्य स्थानिक गोवेकरांना देणार आहे.

शिवसेनेचा दरारा काय असतो हे गोव्याच्या राजकारणाला कळायला लागलं. फोन आले आमच्या मतदारसंघात येऊ नका. शिवसेना म्हणून धोरण आहे, प्रत्येक गाव स्थानिकांना न्याय म्हणजे काय, मोठे सर्व्हे आले. सलग दोन वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री टॉप पाचमध्ये आले आहेत, असं त्यांनी सांगितलं.

Aaditya Thackeray
Goa Election Update : गोव्यातला प्रचार शिगेला, आदित्य ठाकरे, राहुल गांधी गोव्यात | SAAM TV

महाराष्ट्र (Maharashtra) देशातील दुसरे मोठे राज्य आहे. 48 खासदार आहेत. कोरोना काळात सरकारने देशभरातून टॉप 5 मध्ये म्हणजे काहीतरी चांगल करत आहोत. सगळे दखल घेत आहेत. इथल्या मुख्यमंत्र्यांवर कोरोना काळात टीका झाली. कोरोना वॉर्डमध्ये फोटोग्राफर घेऊन फिरले. आमचे मुख्यमंत्री फोटोग्राफर ते नाही असे वागले, असंही ते म्हणाले.

गोव्यात शंख फुंकले. जो आवाज पोहचत नाही तो आवाज पोहचवायला आम्ही आलो. नाशिक गावात पाणी नव्हत वर्तमानपत्रात बातमी होती. आम्ही तिथे पाणी पोहचवण्यासाठी 48 तासात पुल दिला. सरकार आहे, प्रशासनाला हलवून तीन महिन्यात पाणी देणार, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

गोव्यात आलो 72 तास राहिले. काय चक्र फिरणार माहीत आहे. आपल्याला फोकस करायचाय. गोवेकर काय करणार यावर लक्ष आहे. एका बाजूला ताकद केंद्राकडून महाराष्ट्र मोड्युल घेऊन शिवसेना उतरली. सत्ता वरपासून खालपर्यंत आहे, खोटी आश्वासन देतात. गोव्याची शान धनुष्यबाण, असंही ते म्हणाले.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com