Dombivli Crime: हृदयद्रावक! अडीच वर्षाच्या पोटच्या गोळ्याचा आधी जीव घेतला; मग स्वत:चं आयुष्य संपवलं,नेमकं घडलं काय?

Mother End Life After Killing Daughter: डोंबिवलीमध्ये आईने आपल्या मुलीची हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. याप्रकरणाचा तपास मानपाडा पोलिसांकडून सुरू आहे.
Dombivli Crime: पोटच्या अडीच वर्षांच्या मुलीची हत्या करून आईची आत्महत्या, नेमकं कारण काय?
Mother End Life After Killing DaughterSaam Tv
Published On

अभिजित देशमुख, कल्याण

डोंबिवलीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. अडीच वर्षाच्या चिमुकलीची हत्या करत आईने आत्महत्या केली. रूनवाल सिटीमध्ये ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघींचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. मानपाडा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे डोंबिवलीमध्ये खळबळ उडाली आहे.

अडीच वर्षाच्या चिमुकलीची हत्या करत आईने आत्महत्या केल्याची घटना डोंबिवली पूर्वमध्ये घडली. डोंबिवली -कल्याण शीळ रोडवरील हाय प्रोफाईल रूनवाल सिटीमध्ये ही घटना घडली. रविवारी रात्रीच्या सुमारास या महिलेचा पती घरी आल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव पूजा सकपाळ आहे तर चिमुकलीचे नाव समृद्धी सकपाळ आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

डोंबिवली -कल्याण शीळ रोड लगत असलेल्या रुनवाल या सोसायटीमध्ये राहूल सकपाळ हे पत्नी पूजा आणि अडीच वर्षाची मुलगी समृद्धीसोबत राहत होते. चार वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. राहुल रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरी आले असता त्यांना धक्काच बसला. कारण त्यांची पत्नी पूजाने अडीच वर्षाच्या समृद्धीची तोंडावर उशी दाबून हत्या केली. त्यानंतर पूजाने स्वतः देखील आत्महत्या केली. पूजाने असं का केलं? हत्या आणि आत्महत्येचे काय कारण होतं? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com