पुणे - रातोरात औंध Aundh येथील मोदींचे मंदीर Mandir हटवण्यात आले आहेत. मंदिर बांधून मोदींचे दैवतीकरण केले होते. अशा प्रकारे या मंदीरामुळे सर्वत्र टीका होऊ लागल्याने हे मंदिर आता हटवण्यात आले आहे. त्यामुळे मोदींचे हे मंदिर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीकडून NCP आंदोलन करण्यात आले.
मयूर मुंडे या व्यक्तीने नरेंद्र मोदी यांचे औंध येथे मंदिर बांधले होते. मंदिरावरती जोरदार टीका सुरू झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेतल्याने संबंधित मुर्ती रातोरात हटवण्यात आली आहे .मंदिरावर प्लास्टिकचे आवरण टाकून झाकून देण्यात आले आहे. तर रात्रीपासून मुर्ती गायब झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देवच चोरीला गेला म्हणत आम्ही कुणाला साकडे घालायचे?आता आपल्या देशापुढील समस्या कोण दूर करणार ?
यापुढे पेट्रोल,डीझेल, गॅसची दरवाढ झाल्यावर आम्ही कोणाला साकडे घालायचे? आमच्या नवसाला कोण पावणार ? असा असंख्य सवाल उपस्थित करत पुणे शहर राष्ट्रवादीच्या वतीने प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले आहे. इतकेच नाही तर मुर्ती चोरी गेल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात येणार. आता तरी महागाई कमी करणार का? असा सवाल करत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप Prashant Jagtap यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. राष्ट्रवादीच्या वतीने मंदिराबाहेर आरती करण्यात आली. त्याच बरोबर पेट्रोल, डीजल, गोड तेल आणि मसाल्यांचा नैवद्य या ठिकाणी राष्ट्रवादीच्या वतीने दाखवण्यात आला आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.