MNS: मनसेची 'नो टू हलाल' मोहीम; हलालचा पैसा दहशतवादासाठी वापरला जात असल्याचा मनसेला संशय

MNS 'No To Halal' Movement: हलाल अर्थव्यवस्थेतून जमा होणारा पैसा दहशतवादाच्या अंमलबजावणीसाठी वापरला जात असल्याची शक्यता मनसेकडून व्यक्त करण्यात आली आहे.
No To Halal Movement By MNS
No To Halal Movement By MNSSaam TV
Published On

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 'नो टू हलाल' (Halal Meat) ही मोहीम हाती घेतली आहे. इस्लामिक पद्धतीने प्राण्याची होणारी कत्तल यावर आवाज उठवत मनसेने (MNS) 'नो टू हलाल' ही मोहीम हाती घेतलेली आहे. हलाल अर्थव्यवस्थेतून जमा होणारा पैसा दहशतवादाच्या अंमलबजावणीसाठी वापरला जात असल्याची शक्यता मनसेकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे 'नो टू हलाल' या मोहिमेत सामील होण्याचे मनसेकडून आवाहन करण्यात आले आहे. (MNS No to Halal Movement)

हे देखील पाहा -

मशिदीवरील भोंग्यानंतर मनसेची आता 'नो टू हलाल' मोहीम सुरू झाली आहे. मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी आज पत्रकार परिषद घेत हा मुद्दा उपस्थित केला. यशवंत किल्लेदार म्हणाले की, हलाल हा धार्मिक मुद्दा नाही तर अर्थव्यवस्थेवर त्याचा होणारा परिणाम म्हणून आम्हा याकडे पाहतोय. मुस्लिम धर्मियांकडून बकऱ्यांची कत्तल करण्याची पद्धत ही क्रूर आहे. एवढचं नाही तर, मक्क्याकडे तोंड करुन त्यांची कत्तल होते. १५ टक्के मुस्लिम धर्मियांची ही पद्धत ८५ टक्के लोकांवर का लादायची असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. याबाबत मनसेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याची माहीती किल्लेदार यांनी दिली आहे.

पुढे ते म्हणाले की, सरकारने एकदा का त्यांना या गोष्टींच्या आयात आणि निर्यातीला परवानगी दिली की, इतर पदार्थही याद्वारे पाठवली जात आहे. यातून जमा होणारा पैसा कशासाठी वापरला जातो? तर देशाविरोधात करण्यात आलेल्या कारवाईंमध्ये अटक केलेल्या आरोपींच्या न्यायालयीन गोष्टींसाठी वापरला जात असल्याचे समोर आले आहे, त्यामुळे लवकरच याबाबत मनसे 'नो टू हलाल' ही मोहीम राबवणार आहे असं किल्लेदार म्हणाले. त्याचप्रमाणे बाजारात हलालचे मीट घेण्यावर दबाव वाढत आहे. मात्र झटका मीटवर विरोध होत आहे. हा विषय फक्त मांसाहारबाबत नाही, तर इतर पदार्थावरही हलालचं सर्टिफिकेशन वापरलं जात आहे. सर्व अर्थव्यवस्थेवर नियंत्रण मिळवण्याचा छुपा हेतू आहे असाही आरोप मनसेनं केला आहे.

No To Halal Movement By MNS
CJI U U Lalit: न्यायमूर्ती यू. यू. लळीत बनले भारताचे ४९ वे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ

याविरोधात येत्या काळात आम्ही पत्रक छापून हा विषय संबधित कंपन्यांना दिला जाईल, आमचा विरोध हलालला नाही पण झटका मीटही विकले पाहिजे असं किल्लेदार म्हणाले. तसेच पत्र देऊन ऐकले तर ठिक, न ऐकल्यास संबधित कंपन्यांना मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल. येत्या काळात व्यापाऱ्यांच्या असोसिएशनचीही बैठक घेऊन त्यांना मुद्दा स्पष्ट करणार असल्याचं किल्लेदार म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com