
राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मनसे कार्यकर्ते अॅक्शन मोडमध्ये आलेत.
पनवेलमधील 'नाईट रायडर' लेडीज बारची मध्यरात्री मनसैनिकांकडून तोडफोड.
पोलिसांनी १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पनवेल येथील सभेमध्ये डान्स बारचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेच. त्यांनी मध्यरात्री १२ च्या सुमारास लेडीज बारमध्ये घुसून तोडफोड केली. पनवेलमधील कोनगावमध्ये हे बार असून मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. यामध्ये बारचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
राज ठाकरे यांची शनिवारी पनवेलमध्ये शेकापच्या मेळाव्यात डान्स बारचा मुद्दा उपस्थित करत अनेक सवाल केले. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील अनधिकृत डान्स बारांवर तीव्र रोष व्यक्त करत थेट सवाल उपस्थित केले होते. 'छत्रपतींच्या राजधानीमध्ये अनधिकृत बार कसे सुरू राहतात?', असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित करत प्रशासन आणि पोलिस यंत्रणेला इशारा दिला होता. त्यानंतर आक्रमक झालेल्या मनसे कार्यकरत्त्यांनी बारची तोडफोड केली.
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर अवघ्या काही तासांत मनसे कार्यकर्ते सक्रिय झाले. मध्यरात्री १२ वाजता पनवेल तालुक्यातील कोन गावातील ‘नाईट रायडर’ या लेडीज सर्व्हिस बारवर मनसे कार्यकर्त्यांनी धडक कारवाई करत तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी देखील मोठी कारवाई करत मनसे नेते योगेश चिलेसह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, राज ठाकरे यांनी पनवेलमधील सभेमध्ये मराठीच्या मुद्यावर बोलताना रायगडमध्ये वाढलेल्या परप्रांतीयांच्या टक्क्यावर भाष्य केले.. यावेळी त्यांनी रायगडमध्ये वाढलेल्या डान्स बार संस्कृतीवर देखील टीका केली. राज ठाकरे यांनी या सभेमध्ये असे म्हटले की, 'रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला जिल्हा आहे. महाराजांचा राज्यकारभार ज्या किल्ल्यांवरून चालला त्या किल्ल्यावरून या जिल्ह्याला नाव पडले. असे असताना रायगडची ओळख आता डान्सबारचा जिल्हा अशी होऊ लागली आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.