कल्याण डोंबिवलीत मनसेला हादरा; मनसे पदाधिकाऱ्याचा 'जय महाराष्ट्र'!

डोंबिवलीत मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांच्या माध्यमातून मनसे पक्षाला बळकट करण्याचे प्रयत्न सुरु असले तरी कल्याणात मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांची अस्तित्वासाठी धडपड सुरु आहे.
MNS
MNSप्रदीप भणगे
Published On

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मशिदी वरील भोंग्याबाबतची भूमिका आणि मदरशांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. मनसे मधील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. मनसेचे राज्य सचिव इरफान शेख (Irfan Sheikh) यांनी देखील गुढीपाडवा मेळाव्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. गुढीपाडव्याच्या सभेनंतर ठाकरेंच्या उत्तरसभेत देखील त्यांनी भोंग्यांबाबतची भूमिका कायम ठेवल्याने इरफान यांनी मनसे सचिव पद व सदस्यात्वाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, शेख यांनी त्यांचा राजीनामा Social Media वरती टाकल्यानंतर होणाऱ्या टिकेबाबत बोलताना त्यांनी माझ्या जागी कुणी असेल तर तो समाजापुढे हतबल असेल, एखादा आगरी समाजाचा नेता असेल त्याने दि.बा. पाटील यांच्या नावाला विरोध केला तर समाज त्याला जाब विचारणार नाही का ? असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.

MNS
फडणवीसांचे शरद पवारांबद्दल सलग १४ ट्विट; 'या' घटनांचा दिला संदर्भ (पाहा Video)

डोंबिवलीत मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांच्या माध्यमातून मनसे पक्षाला बळकट करण्याचे प्रयत्न सुरु असले तरी कल्याणात मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांची अस्तित्वासाठी धडपड सुरु आहे. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशीदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भुमिकेनंतर शेख यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. ठाण्यातील उत्तर सभेत देखील राज ठाकरे यांनी आपली भूमिका कायम ठेवल्याने शेख यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राज ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात पक्षाच्या आंदोलनात अनेक केसेस अंगावर घेतल्या 2008 सालच्या मराठी पाट्या आंदोलनात पोलिसांकडून झालेल्या बेदम मारहाणीचा आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी दिलेल्या “मी बघतो” या शब्दाची आठवण करून दिली आहे.

प्रामाणिक पणानंतर हे दिवस बघायला मिळाले, एका बाजूने समाजात कुचंबणा दुसरीकडे पक्षात अस्थिर वातावरण. 'माझ्या सारख्या आर्थिक परिस्थिती नसलेल्या कार्यकत्यांने आता कुठे आणि कोणाकडे भावना सांगाव्या? असा प्रश्न विचारत माझा राजीनामा मी खूप जड अंतकरणाने आपल्याला सोपवत असल्याचे नमूद केले आहे. तर 16 वर्षात आजच आपल्याला अजान, मशीद, मदरसे यांच्यावर अचानक संशय का आला. आम्ही तुमच्या सोबत असतांना या तुम्ही या गोष्टी बोलला असता तर आम्ही याचा सोक्षमोक्ष आपल्या समोर केला असता.'

हे देखील पहा -

साहेब आपण आपल्या बाजूने चुकला नसाल ही, पण आमच्या बाजूने अवश्य काही तरी भयंकर घडणार याचा प्रत्यय येत आहे. तरी आपण मी दिलेला राजीनामा स्वीकारावा. गेलेला काळ आणि आपले संबंध मी विसरू शकणार नाही परंतु येणाऱ्या काळात आपण काही तरी चांगले या देशासाठी आणि राज्यासाठी कराल अशी सदिच्छा आणि भावना व्यक्त करत शेख यांनी मनसेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' केला आहे. दरम्यान नाराजी व्यक्त केल्यानंतर कोणत्याही नेत्याने फोन केला नसल्याची खंत इरफान यांनी व्यक्त केली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com