Thane News: कल्याण घटनेची 'पुनरावृत्ती'; मराठी माणसाच्या गळाचेपीविरोधात मनसे-ठाकरे गट आक्रमक!

MNS Thackare group: ठाण्याच्या एका मॉलच्या परप्रांतीय सुरक्षारक्षकाने मराठी महिला रिक्षाचालिकेला मारहाण केली. या घटनेची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली आणि त्यांनी मुजोर सुरक्षारक्षकाला चांगलाच धडा शिकवला.
Thane News
Thane NewsSakal
Published On

कल्याणच्या 'अजमेरा हाइटस' सोसायटीमध्ये देशमुख कुटुंबाला झालेल्या मारहाणीची चर्चा आहे. हे प्रकरण ताजे असतानाच मराठी माणसाच्या गळाचेपीची आणखी एक घटना समोर आहे. गुरुवारी ठाण्याच्या एका मॉलच्या परप्रांतीय सुरक्षारक्षकाने मराठी महिला रिक्षाचालिकेला मारहाण केली. या घटनेची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली आणि त्यांनी मुजोर सुरक्षारक्षकाला चांगलाच धडा शिकवला.

एकुण प्रसंगावर भाष्य करताना मनसे नेते अविनाश जाधव ते म्हणाले, "ठाण्यातल्या मॉलच्या परिसरामध्ये या मुलीची रिक्षा लागलेली असते. रिक्षाच्या भाड्यावरुन परप्रांतीय सुरक्षारक्षक आणि या मुलीमध्ये बाचाबाची झाली. भांडण सुरु असताना सुरक्षारक्षकाने रागात मुलीच्या नाकावर बुक्की मारली. नाकावर झालेल्या जखमांमुळे तिच्या नाकातून रक्त यायला लागले आणि तिला चक्कर आली. दुसऱ्या दिवशी आम्ही त्या रिक्षाचालक मुलीसह मॉलमध्ये पोहोचलो. मनसेनं त्या सुरक्षारक्षकाला धडा शिकवला. एखाद्या महिलेवर हात उचलणं, 'परप्रांतीयांनी' हात उचलणं योग्य नाही."

Thane News
Famous Place In Thane: ठाण्यातील प्रसिद्ध रोमॅन्टिक ठिकाण, गायमुख चौपाटीला नक्की भेट द्या

मनसेनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही एका मराठी माणसाला त्रास देण्याऱ्या परप्रांतीय वरिष्ठ अधिकाऱ्याला दणका दिल्याची माहिती समोर आली आहे. डाबर इंडिया कंपनीमध्ये काम करणाऱ्या महेश पवार यांना त्याचा मॅनेजर नितीश कुमार सहा महिन्यांपासून त्रास देत होता. 'एक बिहारी सब पे भारी' अशी धमकीही नितीश कुमार देत असे. याबाबतची कल्पना महेश यांनी ठाकरे गटाचे दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांना दिली. त्यानंतर ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांनी डाबर इंडिया कंपनीत जाऊन मॅनेजर नितीश कुमारला तंबी दिली.

Thane News
Thane Crime : ऑन ड्युटी पोलिस कर्मचाऱ्यानं आयुष्य संपवलं, मुरबाड पोलिसांत खळबळ

'आपापसाच्या भांडणात मराठी माणसांचा अपमान करु नका', म्हणणाऱ्या देशमुख कुटुंबाला झालेले मारहाण प्रकरण ताजे असताना ठाणे, दक्षिण मुंबईसारख्या परिसरात मराठी आणि मराठी माणसाची गळाचेपी होत असल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांवरुन विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरत आहे.

Edited by: यश शिर्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com