महाराष्ट्राचं अर्थचक्र फिरवायला घेतलाय की स्वतःचं? : मनसेचा पर्यटनमंत्र्यांना सवाल

स्थानिक भूमिपुत्रांना फायदा होणार नसेल तर सगळा पुढाकार स्वतःच अर्थचक्र फिरवायला घेतलाय की महाराष्ट्राच?
Aditya Thackeray
Aditya ThackeraySaam Tv
Published On

मुंबई: मनसेने मुंबईमध्ये आयपीएलची बस फोडल्यानंतर आता पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. महाराष्ट्रामध्ये आयपीएलचे (IPL) सामने भरवून जर स्थानिक भूमिपुत्रांना फायदा होत नसेल तर हा सगळा पुढाकार स्वतःचे अर्थचक्र (Economic) फिरवायला घेतलाय की महाराष्ट्राचं, हा आमचा सवाल आहे, पर्यटनमंत्र्यांना, असे देशपांडे यांनी म्हणले आहे. आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईमध्ये (Mumbai) किंवा महाराष्ट्रातील स्थानिक व्यावसायिकांना न दिल्याने मनसेच्या (MNS) वाहतूक सेनेने मंगळवारी म्हणजे काल मुंबईमध्ये आयपीएलची बस फोडली आहे. (MNS questions tourism minister Aditya Thackeray)

हे देखील पहा-

आयपीएलची बस फोडल्यानवर मनसेने आपला मोर्चा आदित्य ठाकरे यांच्याकडे वळवला आहे. संदीप देशपांडे म्हणाले आहे की, आयपीएल इथे आल्यावर इथले अर्थचक्र फिरेल आहे. या ठिकाणी असलेल्या लोकांना रोजगार मिळणार आहे. ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा आयपीएलच्या अनुषंगाने येणारे आणखी काही रोजगार असणार आहेत, याची कामे जर यूपी आणि दिल्लीच्या (Delhi) लोकांना मिळणार असतील तर महाराष्ट्रातील अर्थचक्र कसे फिरणार आहे? महाराष्ट्रामध्ये आयपीएलचे सामने भरवून जर स्थानिक भूमिपुत्रांना फायदा जर होणार नसेल तर हा सगळा पुढाकार स्वतःचे अर्थचक्र फिरवायला घेतलाय की महाराष्ट्राचं, हा आमचा सवाल आहे पर्यटनमंत्र्यांना असे खोचक ट्विट त्यांनी यावेळी केले आहे.

आयपीएल जर महाराष्ट्रात होत असेल आयपीएलची वाहतूक व्यवस्था स्थानिक कंपन्यांना कंत्राट देऊन करावी, अशी मागणी गेल्या आठवडापासून मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांच्याकडून केली जात होती. त्याकरिता त्यांनी आईपीएल व्यवस्थापन त्याबरोबरच परिवहन मंत्र्यांकडे सुद्धा पत्र देऊन मागणी केली होती.

Aditya Thackeray
Breaking News: नवाब मलिक यांच्या मुलाची विनोबा भावे नगर पोलिसात तक्रार

मात्र, या मागणीला कुठल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही आणि या वाहतूक व्यवस्थेचे कंत्राट महाराष्ट्राबाहेर असलेल्या कंपन्यांना देण्यात आल्याने मनसे आक्रमक झाली होती. वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंसाठी आलेली बस मंगळवारी रात्री फोडली आहे. मुंबईत ताज हॉटेलसमोर उभी असलेली लक्झरी बस मनसे पदाधिकाऱ्यांनी फोडून या सर्व गोष्टीचा निषेध व्यक्त केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com