वसंत मोरेंचे काय चुकले विचारत मनसे शहर उपाध्यक्षांचाही राजीनामा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांना अध्यक्षपदावरुन हटविले गेल्यानंतर आज मनसेला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. पक्षाचे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे
वसंत मोरेंपाठोपाठ मनसे पुणे उपाध्यक्षांचा राजीनामा
वसंत मोरेंपाठोपाठ मनसे पुणे उपाध्यक्षांचा राजीनामा- Saam TV
Published On

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांना अध्यक्षपदावरुन हटविले गेल्यानंतर आज मनसेला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. पक्षाचे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (MNS Pune Vice President Resigns After Vasant More Removal)

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यावरुन घेतलेली भूमीका न मानण्याचा निर्णय घेतल्याने मोरे (Vasant More) यांना पदावरुन हटवून त्यांच्या जागी नगरसेवक साईनाथ बाबर यांची अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे मोरे समर्थकांमध्ये नाराजीची भावना आहे. त्यातच सय्यद यांनी मनसेचे (MNS) नवनियुक्त शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे.

वसंत मोरेंपाठोपाठ मनसे पुणे उपाध्यक्षांचा राजीनामा
'मनसे' कार्यालयाचा फलक फाडला, मुंब्र्यात राष्ट्रवादी-मनसे आमनेसामने

या पत्रात ते म्हणतात की, अत्यंत दुःखी आणि निराश मनाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आज शेवटचा 'जय महाराष्ट्र' करत आहे. मी ज्या समाजातून येतो त्या समाजाबद्दल चुकीची भूमीका घेऊन त्याच पक्षाच्या पक्षाध्यक्षांनी मला पक्ष सोडायला भाग पाडले त्या पक्षाध्यक्षांचे आभार, असाही टोला सय्यद यांनी पत्रात लगावला आहे.

वसंत मोरेंचे काय चुकले असा सवालही सय्यद यांनी या पत्रात उपस्थित केला आहे. त्यांनी फक्त लोकप्रतिनिधी म्हणून जी भावना व्यक्त केली तरी त्यांना काय वागणूक मिळाली हे आज उभ्या महाराष्ट्राने पाहिले. त्यांना ही वागणूक मिळाली तिथे इतर लोकांचे काय, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

पक्ष स्थापन झाल्यापासून आत्ताच जर पाडव्याच्या दिवशी मशिदीच्या भोंग्यांचा आणि मदरशाचा त्रास होत असेल तर नक्कीच काहीतरी चुकीचे होते आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com