मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणातील वक्तव्यानंतर मुंब्र्यातील तन्नवर नगर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन दिवसांपूर्वी मनसेच्या (MNS) वाहतूक सेना 'राजगड' या कार्यालयाचा पक्षाचा लावलेला फलक उतरवण्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत कालावधी दिला होता. फलक न काढल्यास आम्ही आमच्या पद्धतीने फलक काढू मग कोणतीही कारवाई झाली तरी चालेल असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अय्याज बबलू यांनी दिला होता.
या प्रकरणी मुंब्र्याचे (Mumbra) मनसे वाहतूक शाखा अध्यक्ष (MNS Transport Branch President) इरफान सय्यद यांनी मनसे वरिष्ठ पदाधिकारी आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सतर्कता दाखवत मनसे वाहतूक शाखा कार्यालयाच्या ठिकाणी कडक बंदोबस्त लावला होता. तसेच राष्ट्रवादीच्या संबंधीत कार्यकर्त्यांना १४९ अंतर्गत नोटीस देखील बजावल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मनसेचा हा फलक उतरवता आला नव्हता. मात्र वातावरण शांत झाल्यानंतर पोलिसांची पाठ फिरताच काही अज्ञात इसमांनी दगड मारून हा मनसे पक्षाचा फलक फाडला आहे.
हे देखील पाहा -
या मनसेच्या फलकावर दगड मारून फाडतानाचे दृश्य CCTVमध्ये कैद झालं आहे. हा फलक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंडांनी म्हणजेच अयाज बबलू यांनी फाडला असल्याचा आरोप यावेळी मनसे वाहतूक शाखेचे मुंब्रा अध्यक्ष इरफान सय्यद यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी अय्याज बबलू यांनी मनसेचा हा फलक उतरवण्यासाठी धमकी देत फलक न उतरल्यास आम्ही आमच्या स्टाईलने फलक उतरवू असा इशारा दिला होता. या प्रकरणी प्रशासनावर आमचा पूर्ण विश्वास असून मनसे ही गुंडागर्दी खपून घेणार नाही.
तसेच कोणाची इतकी हिम्मत नाही की मनसेचे ऑफिस बंद करेल, सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत त्यानुसार राज ठाकरे यांनी देखील भोंग्यांना विरोध केला आहे, नमाज पठण करण्यासाठी नाही. आपण स्वतः जातिवंत मुस्लिम असून आम्ही मनसे सोबत आणि राज ठाकरे यांच्या सोबत ठाम असल्याचे मत यावेळी मनसे वाहतूक शाखेचे मुंब्रा अध्यक्ष इरफान सय्यद यांनी मांडले.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.