संदीप देशपांडे यांचा कन्नड भाषिकांना कन्नड भाषेतून इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी या प्रकरणाची गंभीर चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.
संदीप देशपांडे यांचा कन्नड भाषिकांना कन्नड भाषेतून इशारा
संदीप देशपांडे यांचा कन्नड भाषिकांना कन्नड भाषेतून इशाराSaam Tv
Published On

मुंबई : बंगरुळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या झालेल्या विटंबनेविरोधात सध्या राजकीय पक्षातून तीव्र नाराजी दिसून येते आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी या प्रकरणाची गंभीर चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. कन्नड भाषिकांना कन्नड भाषेमधूनच मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी थेट इशारा दिलाय. - MNS Leader Sandeep Deshpande Slams Kannada People In Kannada Language

मनसेचे संदीप देशपांडे यांचा कन्नड भाषिकांना कन्नड भाषेतून इशारा

छत्रपतींचा अपमान सहन केला जाणार नाही, कर्नाटकात सुरु असलेल्या दोन पक्षाच्या वादातून महाराजांचा अपमान होतोय. भाजप आणि काँग्रेसच्या अंतर्गत वादातून महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही. मतांसाठी पोळी भाजण्याचं काम सुरु आहे. बसवराज यांनी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावं अन्यथा मनसे त्यांच्यावर नियंत्रण ठेवेल, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिलाय.

हेही वाचा -

संदीप देशपांडे यांचा कन्नड भाषिकांना कन्नड भाषेतून इशारा
शिवराय सगळ्या देशाचे दैवत; कानडी अत्याचाराची पंतप्रधानांनी गंभीर दखल घ्यावी- मुख्यमंत्री

पंतप्रधानांनी या घटनेची गंभीर दखल घ्यावी - मुख्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com