Raj Thackeray Birthday : राज ठाकरेंची वाढदिवसानिमित्त काळीज जिंकणारी खास पोस्ट; मनसैनिकांना आगळीवेगळी विनंती

Raj Thackeray FB Post: यावर्षी राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वाढदिवसापूर्वी खास विनंती केली आहे.
Raj Thackeray
Raj Thackeray saam tv
Published On

Mumbai News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा येत्या 14 जून रोजी वाढदिवस आहे. ते यावर्षी आपला 55 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. राज ठाकरे यांचा वाढदिवस हा मनसे कार्यकर्त्यांसाठी खूपच खास असतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचसोबत मनसे कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी येऊन भेट देतात आणि त्यांना वाढदिवसाच्या (Raj Thackeray Birthday) शुभेच्छा देत भेटवस्तू देतात. पण यावर्षी राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वाढदिवसापूर्वी खास विनंती केली आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray News: महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री राज ठाकरे; शिवतीर्थासमोर बॅनरबाजी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसापूर्वी सर्वांचे मन जिंकणारी फेसबुक पोस्ट केली आहे. या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी यावर्षीच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना विनंती करत भेटवस्तू म्हणून काही खास गोष्टी मागितल्या आहेत. यावर्षी शुभेच्छा द्यायला येणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ, मिठाई किंवा कोणतीही भेटवस्तू आणू नये अशी विनंती त्यांनी केली आहे. याऐवजी झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून द्यावे, अशी विनंती त्यांनी केली. राज ठाकरे यांची ही फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'दरवर्षी 14 जूनला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात.'

'पण यावर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की, कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे.'

Raj Thackeray
Biparjoy Cyclone Update: बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढली; या राज्यांवर धोक्याची घंटा, हाय अलर्ट जारी

या फेसबुक पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी वाढदिवसाच्या दिवशी ते किती वाजता कार्यकर्त्यांना भेटू शकतात ही वेळ देखील सांगितली आहे. 'सकाळी 8:30 ते 12 वाजेपर्यंत मी उपस्थित असेन. तेंव्हा भेटूया 14 जूनला.', असे त्यांनी या पोस्टमध्ये सांगितले आहे. राज ठाकरे यांची ही फेसबुक पोस्ट आता सगळीकडे व्हायरल होत आहे. ऐवढंच नाही तर मनसे कार्यकर्ते आपल्या स्टेटसवर राज ठाकरे यांची ही पोस्ट ठेवत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com