राज ठाकरेंच्या राजकारणाचे नवे संकेत, शिंदेंसोबत युती, 'लवचिक' झाली नाती

MNS Support To Shinde Sena Triggers Rift In Thackeray Alliance: कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेनं शिंदेसेनेला पाठिंबा दिल्यानं राज ठाकरेंची लवचिकता चांगलीच चर्चेत आलीय... अशातच राज ठाकरेंनी नवे संकेत देत ठाकरेंच्या युतीला सुरुंग लावलाय... केडीएमसीत नेमकं काय घडतयं?
Raj Thackeray’s strategic support to Shinde Sena reshapes political equations in KDMC.
Raj Thackeray’s strategic support to Shinde Sena reshapes political equations in KDMC.Saam Tv
Published On

विकासाच्या मुद्द्यावरून मनसेनं कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदेसेनेला पाठिंबा दिला... आणि मराठी अस्मितेसाठी एकत्र आल्याचा दावा करणाऱ्या ठाकरे बंधूंच्या युतीत महिनाभरातच मिठाचा खडा पडला... एकीकडे राज ठाकरेंना कल्याण डोंबिवलीतील भूमिका मान्य नसल्याचा दावा ठाकरेसेनेनं केलेला असतानाच खुद्द राज ठाकरेंनीच मराठी माणसाच्या हितासाठीच लवचिक भूमिका घेतल्याचं मान्य केलयं.. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ऐका...

लवचिक राजकारणाचे संकेत?

राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं. हेच संस्कार आमच्यावर आहेत. मी एक शब्द आज पुन्हा देतो की, आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल. बाळासाहेबांचं मराठी भाषेवर, मराठी प्रांतावर आणि मराठी माणसावर असलेलं जाज्वल्य प्रेम पाहून जी हजारो लाखो लोकं त्यांच्यासोबत येत गेली त्यातला मी एक आहे. त्यामुळे 'बाळासाहेब' आणि 'मराठी' या दोन शब्दांवरची माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा , प्रेम तसूभरही कमी होणार नाही.

दरम्यान मराठी माणसाच्या हितासाठी राज ठाकरे लवचिक भूमिका घेत असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकरांनी स्पष्ट केलयं.. तर राज ठाकरेंनी विकासासाठी युतीची भूमिका घेतल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं...

दुसरीकडे शिंदेसेना आणि मनसेच्या युतीमुळे केडीएमसीत सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपलाही राज ठाकरेंचा चांगलाच पुळका आलाय... राज ठाकरे वैयक्तिक फायद्यासाठी भूमिका घेत नाहीत ते लवकरच महायुतीसोबत येतील, असं विधान भाजपच्या नवनाथ बन यांनी केलयं...

महापालिका निकालानंतर सत्तेचं समीकरण जुळवण्यासाठी विरोधकांसोबतची युती आणि आघाड्यांमुळे मतदारांचा कौल धाब्यावर बसवला जातोय.... अशातच कल्याण-डोंबिवलीत मनसे आणि शिंदेसेनेची युती ठाकरे बंधूंच्य़ा युतीला सुरुंग लावण्यासाठी पुरेशी आहे... मात्र शिंदेसेनेनं हे नवं समीकरण घडवून उद्धव ठाकरेंना एकाकी पडण्याची रणनीती आखलीय का? राज्यात महायुतीला पाठिंबा देऊन यापुढे राज ठाकरे भविष्यातील सत्तेसाठी नवं समीकरण जुळवणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com