MNS on Marathi Patya : मुंबईत मराठी पाट्यांचा प्रश्न पेटला, आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची धरपकड

Mumbai Marathi Patya News : मानखुर्द मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी मानखुर्द विभागातील इंग्रजी पाट्यांना रविवारी काळे फासले. अल्टिमेटमनंतर मनसे आक्रमक झाली.
MNS on Marathi Patya
MNS on Marathi PatyaSaam TV
Published On

सचिन गाड

Mumbai News :

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार दुकानांवरील पाट्या मराठीत लावणे बंधनकारक आहे. यासाठी सुप्रीम कोर्टाने २५ नोव्हेंबरची मुदत देखील दिली होती. मात्र ही मुदत संपूनही पाट्या मराठीत न करणाऱ्या दुकानदारांविरोधात मनसेने आता मोर्चा उघडला आहे.

मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली आहे. आज मनसेचे काही पदाधिकारी कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये पोहोचले होते. खबरदारी म्हणून पोलीस तैनात करण्यात आले होते. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मानखुर्दमध्ये आंदोलन

मानखुर्द मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी मानखुर्द विभागातील इंग्रजी पाट्यांना रविवारी काळे फासले. अल्टिमेटमनंतर मनसे आक्रमक झाली. सरकारने जेवढं गुन्हे दाखल करायचे तेवढे करावे, असा इशारा देखील खांडेकर यांनी दिला होता.

पनवेलमध्ये मनसेची गांधीगिरी

पनवेल मनसेची गांधीगिरी रविवारी पाहायला मिळाली. दुकानांवरील मराठी पाट्यांसंदर्भात दुकानदारांना गुलाबाचे फुल देत मराठी पाट्या लावण्याची विनंती केली. मनसेतर्फे दुकानदारांना आणखी 3 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. बुधवारपर्यंत मराठी पाट्या लावा. बुधवार तुमचा गुरुवार आमचा असा इशारा मनसेने दिला आहे.

MNS on Marathi Patya
Marathi Patya in Mumbai : मुंबईत मराठी पाट्या बंधनकारक; BMC अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये, अधिकारी रस्त्यावर उतरणार

बीएमसी देखील कारवाईसाठी सज्ज

मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरुन २८ नोव्‍हेंबरपासून कारवाई सुरु करण्यात येणार असल्‍याचे महानगरपालिका प्रशासनाने देखील जाहीर केलं आहे. मुंबई महानगरपालिकेने कारवाईसाठी पथक देखील स्थापन केले आहे. या पथकाला कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com