Mla Sunil Shelke : पवना प्रकल्पग्रस्तांचा प्रस्ताव पाठविण्यास दिरंगाई हाेऊ नये, अन्यथा... : आमदार सुनील शेळकेंचा जिल्हाधिका-यांना इशारा

जनरल माेटर्सच्या कामगारांच्या प्रश्नावर सरकारने ताेडगा काढावा असेही आमदार सुनील शेळकेंनी म्हटले.
mla sunil shelke statement on pawna dam project affected people issue
mla sunil shelke statement on pawna dam project affected people issueSaam tv
Published On

Maval News :

प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची साेडवणुक व्हावी यासाठी मी प्रयत्न करीत आहे. येत्या 15 दिवसांत जिल्हाधिकारी शासनाकडे प्रस्ताव पाठवणार आहेत. दरम्यान त्यात दिरंगाई झाल्यास मी शेतक-यांसमवेत असेन अशी स्पष्ट भूमिका आज (शुक्रवार) मावळचे आमदार सुनील शेळके (mla sunil shelke) यांनी पवना धरणग्रस्तांच्या प्रश्नावर बाेलताना नमूद केले. (Maharashtra News)

mla sunil shelke statement on pawna dam project affected people issue
Bhaubeej 2023: साहेब, लहान बहिण म्हणून समजून घ्या... जनरल मोटर्सच्या कामगारांच्या पत्नींची आर्त हाक

आमदार शेळके म्हणाले पवना धरण (pawna dam) 1972 मध्ये पूर्ण झाले. त्या धरणात आमच्या जमिनी गेल्या, आमचं पुनर्वसन करा, मात्र राज्यत सरकार येथे जाते आमच्या प्रश्नाची कोणीही दखल घेत नाही. अजूनही धरणग्रस्त न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेले चार वर्ष झाले आम्ही धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी प्रयत्न करीत आहे. पंधरा दिवसात जिल्हाधिकारी शासनाकडे प्रस्ताव पाठवणार आहे. मात्र यात काही दिरंगाई झाली तर मी शेतकऱ्यांसोबत आहे. ते कोणतीही आंदोलनाची भूमिका घेतली तरी मी त्यासोबत राहील असे आमदार शेळके यांनी स्पष्ट केले.

दरम्यान तळेगाव येथील जनरल मोटर्सचे कामगार त्रेचाळीस दिवस झाले साखळी उपोषण करीत आहेत. त्यांनी काळी दिवाळी साजरी केली. मात्र जिथे काम होईल त्या ठिकाणी मी जात आहे हे कामगारांना माहिती आहे. खरं तर राज्य सरकारने यातून मार्ग काढायला पाहिजे असे मत आमदार सुनील शेळके यांनी जनरल माेटर्सच्या कामगारांच्या प्रश्नावर व्यक्त केले.

Edited By : Siddharth Latkar

mla sunil shelke statement on pawna dam project affected people issue
Swabhimani Shetkari Sanghatana Andolan : राजू शेट्टींनी साखर कारखाना काढून दाखवावा असे नेत्याने म्हणताच स्वाभिमानीचे आंदाेलक खवळले अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com