Mla Sangram Jagtap : शिंदे फडणवीस सरकारच्या विराेधात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांनी ठाेठावले न्यायालयाचे दरवाजे; जाणून घ्या कारण

विद्यमान सरकारने या निधीवर स्थगिती आणल्याने विकासकामे ठप्प झाले आहेत.
Mla Sangram Jagtap, Nagar, Maharashtra Government
Mla Sangram Jagtap, Nagar, Maharashtra Governmentsaam tv
Published On

- सुशिल थाेरात

Mla Sangram Jagtap : विकासकामांच्या निधीवर सरकार स्थगिती उठवत नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (NCP Mla Sangram Jagtap) यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबत छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केल्याची माहिती आज आमदार जगताप यांनी माध्यमांना दिली. (Maharashtra News)

Mla Sangram Jagtap, Nagar, Maharashtra Government
Satara Crime News : माजी नगरसेविकेसह कुटुंबावर तलावर हल्ला; माजी नगरसेवकासह 15 जणांवर गुन्हा दाखल

नगर शहराच्या विकासासाठी तत्कालीन महाविकास आघाडी (mva) सरकारच्या काळात विविध योजनांतर्गत सुमारे 50 कोटी रूपयांच्यावर निधी मंजूर करून आणूनही विद्यमान सरकारने या कामांना स्थगिती दिली आहे. ही स्थगिती न उठविल्याने उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली असल्याचे नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलंय.

आमदार संग्राम जगताप यांनी विधीमंडळाच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. नगर शहरातील तसेच बस स्थानके आणि इतर सोईसुविधांचा विकास करण्यासाठी पोलीस मुख्यालयातील पोलीस वसाहत सुधारणा यासाठी निधी मंजूर केला होता. मात्र विद्यमान सरकारने या निधीवर स्थगिती आणल्याने विकासकामे ठप्प झाले आहेत. त्यामुळे अखेर आमदार संग्राम जगताप यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com