MLA Sadabhau Khot Attack : गोरक्षकांकडून आमदार सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्की| Video

MLA Sadabhau Khot Attacked In Goshala Video: पुण्यातील फुरसुंगी गोशाळेत आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला आहे.
MLA Sadabhau Khot Attacked In Goshala
MLA Sadabhau Khot attacked by cow vigilantes at Fursungi Goshala in Punesaamtv
Published On
Summary
  • पुण्यातील फुरसुंगी गोशाळेत आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न.

  • गोरक्षकांनी शेतकऱ्यांच्या म्हशी नेल्यामुळे वाद निर्माण झाला.

  • गोरक्षकांनी आमदार खोत आणि शेतकऱ्यांवर धावून जाऊन धक्काबुक्की केली.

  • खोत यांनी पोलिस स्थानकासमोर आंदोलन करण्याची घोषणा केली.

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

पुण्यातील हडपसर भागातील द्वारकाधीश गोशाळेत आमदार सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्की झालीय. गुंड प्रवृत्तीच्या गोरक्षकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. फुरसुंगी परिसरातील द्वारकाधीश गोशाळेतील धक्कादायक घटना घडलीय. फुरसुंगीच्या गोशाळेत गोरक्षक शेतकऱ्यांच्या म्हशी नेल्या होत्या. त्याची पाहणी करण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत फुरसुंगीच्या गोशाळेत गेले होते. त्यावेळी शेतकरी आणि सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षक धावून आले होते. पोलीस स्टेशन सदाभाऊ खोत या सगळ्या संदर्भात दाद मागण्यासाठी सिंहगड रोड पोलीस स्थानकासमोर आंदोलन करणार आहेत.

दोन महिन्यांपूर्वी सांगलीच्या शेतकऱ्यांना मारहाण करून त्यांचा १० म्हशी जबरदस्तीने फुरसुंगीच्या गोशाळेत नेऊन ठेवलं होतं. शेतकऱ्यांना न्यायालयात जाऊन मग या म्हशी परत मिळवण्यासाठी आदेश मिळाले होते. तो आदेश घेऊन शेतकरी गोशाळेत म्हशी घेण्यासाठी गेल्यावर म्हशी गोशाळेत नसल्याचे लक्षात आलं.

MLA Sadabhau Khot Attacked In Goshala
Shocking : कायद्याचा रक्षकच कुटुबियांच्या मारहाणीचा बळी ठरला, धक्कादायक कारण समोर, काय घडलं?

सदाभाऊ खोत आणि शेतकऱ्यांना गोशाळेत विचारणा केल्यानंतर गोरक्षकांनी उडवाउडवीची उत्तरं दिले. म्हशींना चरायला डोंगरावर सोडल्यावर त्या निघून गेल्याचे उडवाउडवीची उत्तरं गोशाळा वाल्यानं दिली. त्यानंतर सदाभाऊ खोत यांच्याशी गोरक्षकांनी बाचाबाची केली. त्यानंतर धक्काबुक्की झाली.

MLA Sadabhau Khot Attacked In Goshala
Gautam Gaikwad: सिंहगडावरून पडला,पाच दिवस जंगलातच; गौतम गायकवाडच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट!

गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू

गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरूय. यांचे कॉर्पोरेट ऑफिस असून शेतकऱ्यांना याचा त्रास होतोय. सरकारने याबाबत लक्ष घालून कारवाई करावी. यावर कारवाई केली नाही तर पोलीस स्टेशन समोर आम्ही जनावराच्या छावण्या उभं करू, असा थेट इशारा रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी दिलाय. गाई म्हशीमध्ये राहून आमची माय-बहीण, बाप शेण, दूध काढतो आणि हे गोरक्षक म्हणणारे मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमधून धंदा करत असल्याचं आमदार सदाभाऊ खोत म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com