Ravindra Dhangekar: 'माझा विजय पक्का, विरोधकांच्या छातीत आत्तापासूनच धडकी', रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर पलटवार

Kasba Assembly Constituency Pune: विधानसभा निवडणूक जाहीर होताच आमदार रवींद्र धंगेकर कमला लागले आहेत. यातच भाजपने केलेल्या एका आरोपाला त्यांनी प्रत्युत्तर दिल आहे.
'माझा विजय पक्का, विरोधकांच्या छातीत आत्तापासूनच धडकी', रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर पलटवार
Ravindra DhangekarSaam Tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

आचारसंहिता लागू असताना सुद्धा पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र दंगेकर हे दिवाळीचा सरंजाम वाटत असल्याचा आरोप आज भाजपने केला. यावर आता आमदार धंगेकर यांनी भाजपवर टीका केलीय.

नागरिकांच्या दिवाळीत सहभागी व्हावे म्हणून दरवर्षी माझा मित्रपरिवार 'आनंदाची दिवाळी' नागरिकांना भेट म्हणून देतो. निवडणूक आयोगाने निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे आणि याची मला पूर्ण जाणीव आहे. कुठल्याही प्रकारच्या वस्तूचे वाटप करण्यात माझा व्यक्तीश: सहभाग नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो. मी अजून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो नाही. तरीपण माझा विजय पक्का असल्याने विरोधकांच्या छातीत आत्तापासूनच धडकी भरल्याचे चित्र स्पष्ट जाणवत आहे, अशी टीका धंगेकर यांनी भाजपवर केली आहे.

'माझा विजय पक्का, विरोधकांच्या छातीत आत्तापासूनच धडकी', रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर पलटवार
Maharashtra Politics: मुखात दादा, मनात साहेब? दिलीप वळसे पाटलांच्या भूमिकेने समर्थक संभ्रमात?

दरम्यान, भाजपने आज आपली पहिली यादी जाहीर केली असून यामध्ये ९९ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यातच भाजपने पश्चिम महाराष्ट्रात कोणाला संधी दिली आहे, ते जाणून घेऊ...

पश्चिम महाराष्ट्रातील भाजप उमेदवार

1. दौण्ड : ॲड राहुल कुल

2. चिंचवड : शंकर जगताप

3. भोसरी : महेश लांडगे

4. शिवाजीनगर : सिद्धार्थ शिरोळे

5. कोथरुड : चंद्रकांत पाटील

'माझा विजय पक्का, विरोधकांच्या छातीत आत्तापासूनच धडकी', रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर पलटवार
BJP Internal Politics: पहिली यादी जाहीर होताच भाजपमध्ये अंतर्गत कलह, या उमेदवारांच्या नावाला विरोध

6. पर्वती : माधुरी मिसाळ

7. सोलापूर उत्तर : विजयकुमार देशमुख

8. अक्कलकोट : सचिन कल्याणशेट्टी

9. सोलापूर दक्षिण : सुभाष देशमुख

10. मान : जयकुमार गोरे

11. कराड दक्षिण : डॉ. अतुल भोसले

12. सातारा : छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

13. कोल्हापूर दक्षिण : अमल महाडिक

14. इचलकरंजी : राहुल आवाडे

15. मीरज : सुरेश खाडे

16. सांगली : सुधीर गाडगीळ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com