Devendra Bhuyar News : दादांचा आमदार बरळला; भरसभेत ठरवली मुलींच्या सौंदर्याची कॅटेगरी, पाहा व्हिडिओ

Devendra Bhuyar Controversial Statement On Womens: महायुतीतील नेत्यांकडून सुरू असलेली महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही. त्यातच आता दादांच्या समर्थक आमदाराची भर पडलीय. याच देवेंद्र भुयार यांच्या बेताल वक्तव्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट

भरत मोहोळकर, साम टीव्ही

मुंबई : महिलांबद्दल बेताल विधान करणारे हे आहेत अजित पवारांचे समर्थक वरुड-मोर्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार... या महोदयांनी लग्नाबाबत बोलताना मुलींच्या सौंदर्यावरून त्यांची कॅटेगरी ठरवली. मुलांच्या व्यवसायानुसार लग्नासाठी थेट मुलींच्या सौदर्याचं वर्गीकरण करून भरसभेत जोड्या जुळवल्या.....त्यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. तर दादांचे आमदाराला महिलांचं रुपावरून वर्गीकरण करण्याचा अधिकार काय? असं म्हणत काँग्रेस आमदार यशोमती ठाकूरांनी भुयारांवर सडकून टीका केलीय. तर मंत्री चंद्रकांत पाटलांनी भुयारांच्या दिलगिरीची ग्वाही दिलीय..

आमदार देवेंद्र भुयारच नाही तर महायुतीच्या इतर नेत्यांनीही महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्ये केलेत.

महायुतीच्या नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्य

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मंत्री सुधीर मुनगंटीवारांकडून आणीबाणीचं उदाहरण देताना वादग्रस्त विधान

मंत्री अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंना शिवीगाळ

मंत्री गुलाबराव पाटलांकडून रस्त्यांची तुलना हेमा मालिनीच्या गालाशी केली

महायुतीच्या नेत्यांकडून सातत्याने महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्ये केले जातात. त्यामुळे या बेताल वक्तव्य करणा-या आमदार आणि मंत्र्यांना वरिष्ठ नेत्यांनी चाप लावण्याची गरज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com