कोट्यवधींची पावडर! मुंबई विमानतळावर लाखोंची सोनं जप्त

मुंबई विमानतळावर स्मगलिंगकरिता आणलेले तब्बल २ किलो सोनं जप्त करण्यात आले
कोट्यवधींची पावडर! मुंबई विमानतळावर लाखोंची सोनं जप्त
कोट्यवधींची पावडर! मुंबई विमानतळावर लाखोंची सोनं जप्तSaam Tv
Published On

मुंबई : मुंबई विमानतळावर स्मगलिंगकरिता आणलेले तब्बल २ किलो सोनं जप्त करण्यात आले आहे. हे सोनं विमानाच्या सीटखाली ओल्या कचऱ्याच्या स्वरुपात ठेवण्यात आले होते. मुंबई मधील कस्टम विभागाला या मोडस ऑपरेंडीची कल्पना आल्यावर त्यांनी योग्य पावले उचलत सोनं जप्त करण्यात आले आहे. अबुधाबीतून मुंबईला आलेल्या इत्तेहाद एअरलाईन्सच्या विमानात तब्बल २ किलो सोन्याची पेस्ट ठेवण्यात आली होती.

हे देखील पहा-

विमानाच्या सीटखाली सेफ्टी जॅकेट्स ठेवले असतात, त्याठिकाणी हे सोनं लपवून ठेवण्यात आले होते. एका व्यक्तीच्या पँटला या सोन्याची पेस्ट आतून लावण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी या व्यक्तीला पकडून सोनं जप्त करण्यात आले आहे. अबुधाबीहून एका प्रवाशाने हे सोनं आणले होते आणि विमानाच्या सीटखाली लपवून ठेवण्यात आले होते. विमानाची साफसफाई करण्याकरिता येणाऱ्या स्टाफपैकी कुणीतरी हे सोनं विमानातून बाहेर काढणार होता.

आतापर्यंतच्या मोडस ऑपरेंडीनुसार या कटात सहभागी असणारा सफाई कर्मचारी ते सोनं विमानातून बाहेर काढत असे, ती ओली पेस्ट आपल्या ट्राऊझरला लावत असे आणि विमानतळावरून आपली ड्युटी संपवून बाहेर येत असणार. विमानतळ समन्वयाच्या माध्यमातुन अबुधाबीतून पेस्टच्या स्वरुपातील सोनं भारतात येत असल्याची टीप कस्टम विभागाला मिळाली होती.

कोट्यवधींची पावडर! मुंबई विमानतळावर लाखोंची सोनं जप्त
Drugs Case : ड्रग्ज तस्करीचे कर्दनकाळ समीर वानखेडेंना अटकेची भीती?

यानुसार त्यांनी सापळा रचला होता. आपल्या ट्राऊझरच्या आतमध्ये सोन्याची पेस्ट लावून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी तपासले असता त्याला अटक करण्यात आले आहे. विमानचा स्टाफ आणि विमानतळावरचा स्टाफ या दोन्ही ठिकाणचे कर्मचारी या कटात सहभागी असणार, असा संशय कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे. मात्र, चोरीचा हा पॅटर्न कस्टम विभागाने शोधून काढला आणि तो पकडला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com