Vikroli Mhada Building
Vikroli Mhada Building

MHADA: विक्रोळीत म्हाडाच्या इमारतीचा स्लॅब कोसळला; दोन रहिवाशांचा मृत्यू

Vikroli Mhada Building House slab Collapsed : इमारतीमधील घराचा स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.
Published on

मुंबई : विक्रोळी येथे इमारतीमधील घराचा स्लॅब कोसळल्याची घटना घडलीय. यात दोन रहिवाशांचा मृत्यू झालाय. सूर्यकांत म्हादलकर, शरद म्हसाळ अशी या रहिवाशांची नावे आहेत. स्लॅब कोसळण्याच्या दुर्घेटनेत हे दोघेही जखमी झाले होते. त्याच्यावर आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळी पूर्वमधील रमाबाई आंबेडकर उद्यानाजवळ असलेल्या म्हाडाच्या ४० क्रमांक इमारतीमध्ये घरातील स्लॅब कोसळला यात दोन जणांचा मृत्यू झालाय. दुर्घटनाग्रस्त इमारत ग्राऊड प्लस तीन मजली आहे. या इमारतीमधील एका घराच्या छताच्या एका बाजुचा स्लॅब कोसळला. कोसळलेल्या स्लॅबमुळे दोन जण जखमी झाले होते. त्यांना स्थानिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तेथे या दोघांवर उपचार सुरू होता, त्याचदरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ.एम.एस. जाधव यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com