MHADA: पुण्यात म्हाडाची बंपर लॉटरी! ५२ फ्लॅट अन् २८ ऑफिससाठी नोंदणी सुरु, अर्ज मागवले

MHADA Home And House Online Registration: म्हाडाने ५२ फ्लॅट्स आणि २८ ऑफिसच्या विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु केली आहे. पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर येथे हे फ्लॅट्स आणि ऑफिसची विक्री होणार आहे.
Pune MHADA Lottery
Pune Mhada Lottery Saam TV
Published On

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाने अनेक ऑफिसच्या विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु केली आहे. पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूरमधील विविध योजनांअंतर्गत हे ऑफिस स्पेस तयार करण्यात आले आहेत. या योजनेत ५१ निवासी फ्लॅट्स आणि २८ ऑफिस स्पेसची विक्री करण्यासाठी काढले आहे.

Pune MHADA Lottery
CIDCO Lottery: सिडकोची बंपर लॉटरी निघणार, कोण कोणत्या लोकेशनवर आहेत घरं?

या फ्लॅट्स आणि ऑफिसच्या विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु केली आहे. या मालमत्ता १९८१ च्या महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास नियमावली आणि १९८१ च्या म्हाडा कायद्यानुसार ई-लिलाव प्रक्रियेद्वारे विकल्या जाणार आहेत.

या मालमत्तेबाबत सर्व माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. याचसोबत पात्रता, निकष, आरक्षण, अटी आणि शर्ती तसेच अर्जाची प्रक्रिया देण्यात आली आहे.www.education.mhada.gov.in आणि www.mhada.gov.in वर सर्व माहिती उपलब्ध आहे. म्हाडाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

यामध्ये १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना आणि २० टक्के समावेशक योजनेअंतर्गत सोडतीनंतर रिक्त झालेल्या सदनिकांचे वितरण करण्यात येणार आहे.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर ही घरे विक्रीसाठी काढली जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही https://bookmyhome.mhada.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात. यासाठी नोंदणीप्रक्रिया १० एप्रिलपासून सुरु आहे. पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर अर्ज करावेत.

Pune MHADA Lottery
MHADA : म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील गाळ्यांचे कुलूप तोडून घुसखोरी; अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना चौघेजण ताब्यात

सदनिका वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक असून देकार पत्र हे उपमुख्य अधिकारी,म्हाडा यांच्या डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांच्या लॉग-इन आयडीमध्ये उपलब्ध करुन देण्यात येते. कोणतेही देकार पत्र मानवी हस्ताक्षर करुन तसेच रबरी शिक्क्याचा वापर करुन दिले जात नाही, अशी माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

Pune MHADA Lottery
LIC Scheme: दररोज १५० रुपये भरा अन् १९ लाख मिळवा; LIC ची भन्नाट योजना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com