MHADA Exams: मोठे मासे गळाला, पुण्यात तिघांना अटक

आरोग्य भरतीनंतर म्हाडा परीक्षेचा पेपर फुटणार होता, असा दावा केला जात आहे.
MHADA Exams: मोठे मासे गळाला,पुण्यात तिघांना अटक
MHADA Exams: मोठे मासे गळाला,पुण्यात तिघांना अटकSaam Tv
Published On

पुणे - म्हाडा भरती परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर पोलिसांची कारवाई सुरु असून याप्रकरणी आता मोठे मासे गळाला लागल्याची शक्यता आहे. तिघेही आरोपी रात्री पेपर फोडण्याच्या तयारीने एकत्र आले असताना पुणे सायबर पोलिसांनी रंगेहात पकडले. आरोग्य भरतीनंतर म्हाडा परीक्षेचा पेपर फुटणार होता, असा दावा केला जात आहे. सायबर पोलिसांची सतर्कता आणि एमपीएससी समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश आले आहे. आज तिन्ही आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली.

हे देखील पहा -

दरम्यान, म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. म्हाडाच्या व इतर परीक्षा काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आल्या असून या परीक्षा आता जानेवारीमध्ये होणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे. परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची जी गैरसोय होणार आहे, त्याबद्दल मी क्षमा मागतो. म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्याने परीक्षा सेंटरवर जाऊ नये, असे जितेंद्र आव्हाड विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.

MHADA Exams: मोठे मासे गळाला,पुण्यात तिघांना अटक
कसं काय शेलार बरं हाय का ? शेलारांविरोधात शिवसेनेची आक्रमक बॅनरबाजी

म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याबाबद ट्विट करत जितेंद्र आव्हाड म्हणले की, या परीक्षा संदर्भात काही जणांनी दलालांना पैसे दिले होते असे माझ्या कानावर आले आहे. तुम्ही ज्या कोणत्या व्यक्तीला पैसे दिले असतील तर ते हक्काने परत घ्या. म्हाडाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो तुमचा अधिकार, बुद्धीचा सन्मान करत पैशाने तो मारला जाईल असे मी कधीच होऊ देणार नाही.माझ्याकडे आलेल्या तक्रारीमध्ये काही लोकांनी आपली जमीन विकली तर काही लोकांनी आपल्या घरातले दागिने विकले आहेत. कोणी कर्ज काढले आहेत. त्यामुळे माझी या दलालांना नम्र विनंती आहे की हे पैसे ज्यांच्याकडून घेतले आहे त्यांना परत करा. कारण तुम्ही त्यांचे काम करू शकणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही असे देखील जितेंद्र आव्हाड म्हणले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com