Mega Block
Mega BlockSaam Digital

Mega Block : रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक: कोणत्या मार्गावरील सेवा असतील सुरू? जाणून घ्या

Mumbai Local Mega Block : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी ९ जून २०२४ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Published on

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी ९ जून २०२४ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी- विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी - चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप- डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वे -सीएसएमटी ते विद्याविहार अप - डाऊन धीम्या मार्गावर, सकाळी ११.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटीवरून येथून सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील धीम्या लोकल डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकावर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर मार्गावर वळविण्यात येणार आहेत. घाटकोपरहून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबेल.

हार्बर रेल्वे- सीएसएमटी - चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर- ११. १० ते ४.१० वाजेपर्यंत

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी /वडाळा येथून वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव येथून सीएसएमटीसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. तर, पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकरीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा २० मिनिटांच्या वारंवारतेने चालवल्या जातील.

Mega Block
Mumbai BMC News: वेसावेतील सागरी किनारा क्षेत्रात अनधिकृत बांधकाम; दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांचं निलंबन

पश्चिम रेल्वे-चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप - डाऊन जलद मार्गावर, सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यत

या ब्लॉकदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन उपनगरीय सेवा रद्द राहतील. याशिवाय काही लोकल सेवा दादर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे.

Mega Block
Coastal Road: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका! सागरी किनारा मार्ग होणार सुरु, जाणून घ्या संपूर्ण माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com