Pune MNS News : वैद्यकीय महाविद्यालयाची तोडफोड भोवली, पुण्यात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Pune News : मनसेने त्यांच्या खळखट्याक पद्धतीने आंदोलन करत डॉ. बंगिनवार यांच्या केबिनची तोडफोड केली.
Pune MNS News
Pune MNS NewsSaam TV
Published On

अक्षय बडवे

Pune News : पुण्यातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ आशिष बंगिनवार यांच्या कार्यालयाची तोडफोड मनसे कार्यकर्त्यांनी काल केली होती. याप्रकरणी आता पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्यासाठी २० लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्याला (डीन) लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) अटक केली होती. या संबंधित जाब विचारण्यासाठी मनसेकडून काल महाविद्यालयात आंदोलन करण्यात आले.

Pune MNS News
Kalyan Political News : कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे-शिंदे गट एकत्र, शिंदे गटाच्या आमदाराचं ठाकरे गटाला आवाहन

यावेळी मनसेने त्यांच्या खळखट्याक पद्धतीने आंदोलन करत बंगिनवार यांच्या केबिनची तोडफोड केली. या तोडफोडीमध्ये दोन कॉम्प्युटर आणि खुर्च्यांचे नुकसान झाले होते. (Latest Marathi News)

या प्रकरणी मनसेच्या आशिष साबळे, प्रशांत कनोजिया, धनंजय गवळी आणि इतर ५-६ जणांवर सार्वजनिक संपत्तीस हानी पोहचवली म्हणून गुन्हा दखल करण्यात आला आहे.

महाविद्यालयात झालेल्या भ्रष्टाचार संदर्भात जाब विचारण्यासाठी आमदार रविंद्र धंगेकर देखील तेथे पोहोचले होते. कार्यकत्यांनी बंगिनवार यांच्या पाटीला काळे फासले होते. (Latest News Update)

Pune MNS News
Navneet Rana News: न्यायव्यवस्था म्हणजे गंमत नव्हे, राणा दाम्पत्याला कोर्टानं झापलं; दिला शेवटचा अल्टिमेटम

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळण्यासाठी सुमारे १५ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. या कोट्यातून प्रवेश मिळण्यासाठी २२ लाख रुपये शुल्क आहे. मात्र त्या व्यतिरिक्त २० लाख रुपये देण्याची मागणी बंगिनवार यांनी एका विद्यार्थिनीच्या पालकांकडे केली होती.

त्या विद्यार्थिनीच्या पालकांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीने बंगिनवार यांना ताब्यात घेण्यासाठी सापळा लावला होता. तक्रारदार यांच्याकडून पैसे स्वीकारताना त्यांना पकडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com