'माझ्या जीवाला धोका'; पोलिस संरक्षणासाठी महापौरांनी लिहंल गृहमंत्र्यांना पत्र (पहा Video)

महापौर किशोरी पेडणेकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना पत्र लिहंल असून या पत्रामध्ये त्यांनी स्वतः साठी आणि कुटुंबियांसाठी विशेष पोलीस सुरक्षा मिळावी अशी मागणी केली आहे.
'माझ्या जीवाला धोका'; पोलिस संरक्षणासाठी महापौरांनी लिहंल गृहमंत्र्यांना पत्र (पहा Video)
'माझ्या जीवाला धोका'; पोलिस संरक्षणासाठी महापौरांनी लिहंल गृहमंत्र्यांना पत्र (पहा Video)सुमित सावंत
Published On

मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांना पत्र लिहंल असून या पत्रामध्ये त्यांनी स्वतः साठी आणि कुटुंबियांसाठी विशेष पोलीस सुरक्षा मिळावी अशी मागणी केली आहे. महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना धमकीचं पत्र आल्याने तसंच मागील दोन दिवसात महापौर यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांमुळे आपल्या जीविताला धोका असल्यामुळे विशेष सुरक्षा मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

पहा व्हिडीओ -

महापौरांना अज्ञातांनी पाठविलेल्या पत्रामध्ये अश्लिल भाषा वापरत आपल्या कुटुंबातील व्यक्तींना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच आपणाला पाठवलेल्या पत्रामध्ये असलेला मजकूर हा अतिशय लज्जास्पद असून महिलांची विटंबना करणारा व व क्लेशदायक आहे. या विषयाबाबत मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र दिलं असून स्थानिक भायखळा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली असल्याचंही महापौरांनी (Mayor) पत्रामध्ये लिहलं आहे.

'माझ्या जीवाला धोका'; पोलिस संरक्षणासाठी महापौरांनी लिहंल गृहमंत्र्यांना पत्र (पहा Video)
अनैतिक संबंधातून झालेले बाळ रेल्वेत ठेवून जाणाऱ्या आईला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दरम्यान मागील 2-3 दिवसातील घडामोडींचा विचार करता पत्र पाठविणाऱ्या सदर व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यानां अटक करण्याचे आदेश द्यावे, तसेच मला व माझ्या कुटुंबियांना त्वरीत विशेष पोलिस संरक्षण देण्यात यावे अशी विनंती किशोरी पेडणेकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्राद्वारे केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com