Maratha Aandolan: मग अशा मागण्या का करायच्या? हायकोर्टाने मराठा आंदोलकांच्या वकिलांनाच खडसावले; कोर्टात नेमकं काय घडलं?

Manoj Jaranges Maratha protest: मुंबई हायकोर्टात पुन्हा सुनावणी झाली. या सुनावणी वेळी कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांच्या वकिलांनाच खडेबोल सुनावले. सुनावणी उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
Maratha Aandolan
Manoj Jaranges Maratha protestSaam
Published On

Summary -

  • हायकोर्टाने आंदोलकांच्या वकिलांना थेट खडसावले.

  • “अशा मागण्या का करायच्या?” असा प्रश्न न्यायमूर्तींनी विचारला.

  • सुनावणी उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत पुढे ढकलली.

  • मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर उद्या काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.

Maratha Aandolan: मुंबई हायकोर्टातील कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर पुन्हा एकदा मराठा आंदोलन या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. मनोज जारांगे यांच्या आणि मराठा आंदोलक यांची बाजू सतीश मानेशिंदे यांनी माडंली. त्यांनी कोर्टासमोर सांगितले की, 'सर्व वाहनांना मुंबई सोडण्याचे आदेश दिले आहेत. कॅबिनेट सचिव माझ्या पक्षकाराला भेटण्यासाठी येत आहेत आणि मला मिळालेल्या सूचनांनुसार काही तोडगा निघेल. ९० टक्के आंदोलकांनी स्थळ सोडले आहे.'

न्यायमूर्तींनी यावेळी मराठा आंदोलकांची बाजू मांडणाऱ्या सतीश माने शिंदे यांनाच खडसावले. 'तुम्ही तिथे का बसला आहात? तुम्ही तिथे तळ ठोकू शकता का? तुम्हाला फक्त २४ तासांसाठी परवानगी देण्यात आली होती. पण तुम्ही तिथे अजूनही आहात. तुम्ही दुसऱ्या ठिकाणी का जाऊ शकत नाही?' यावर माने शिंदे यांनी सांगितले की, 'आता जागा बदलणे शक्य नाही. या ५ हजार लोकांना आता एकत्रितपणे दुसऱ्या ठिकाणी नेणे शक्य होणार नाही.'

न्यायमूर्ती यांनी माने शिंदे यांना पुन्हा सवाल केला की, 'तुमचे समर्थक नक्कीच तुमचे ऐकतील. तुम्हाला तिथे किती काळ बसू द्यायचे हे आम्हाला पाहावे लागेल.' यावेळी मानेशिंदे यांनी 'कृपया सुनावणी उद्या सकाळपर्यंत पुढे ढकला.' अशी विनंती कोर्टाकडे करतउद्यापर्यंत कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची खात्री देतोय असे सांगितले. न्यायमूर्तींनी मानेशिंदे यांना खडसावून सांगितले की, 'कायद्याचे राज्य राखले गेलेच पाहिजे. आम्ही कोणताही सक्तीचा आदेश देण्यास नाखुष आहोत. कारण यापूर्वीच कोर्टाच्या आदेशाने तुम्हाला तिथे बसण्याची परवानगी दिली आहे. पण तुम्हालाही कायद्याच्या नियमांचा आदर करावा लागेल.'

माने शिंदे यांनी कोर्टाकडे अशी देखील विनंती केली की, 'आम्हाला थोडा वेळ द्यावा. उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात यावी. आम्ही फक्त एकदा मायक्रोफोनवरून लोकांना जायला सांगितलं आणि लोक मुंबई सोडून निघाले.' न्यायमूर्तींनी माने शिंदे यांना स्पष्ट सांगितले की, 'तुमचा किती प्रभाव आहे, ते पाहा. तुमचा जनतेवर मोठा प्रभाव आहे. अशा प्रकारे लोकांचा वापर करू शकत नाही. त्यांच्या प्रभावाचा गैरवापर करू शकत नाही. आम्ही हे लिहणार नाही, पण तुम्हाला हे समजलं पाहिजे. तसेच, मुख्य प्रकरण (आरक्षणाला आव्हान) या न्यायालयात प्रलंबित आहे. तुम्ही तिथे का हस्तक्षेप केला नाही? आता अशा मागण्या कशा करू शकता?'

Maratha Aandolan
Maratha Reservation: या ताटातलं काढून त्या ताटात द्या हे... चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले? VIDEO

माने शिंदे यांनी कोर्टात असे देखील सांगितले की, 'मला तिथल्या राज्याच्या वकिलांवर विश्वास आहे.' यावर न्यायमूर्ती म्हणाले की, 'मग राज्यावर आणि त्याच्या वकिलांवर विश्वास ठेवा. मग अशा मागण्या का करायच्या?' तुमच्या विनंतीवरून, हे प्रकरण उद्या सकाळपर्यंत पुढे ढकलत आहोत.' कोर्टाने सुनावणी उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत पुढे ढकलली आहे. आता उद्या नेमका काय निर्णय होणार हे पाहणं महत्वाचे राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com