डोंबिवली: डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढले होते. सतत वाहनचोरी, चेन सँचिंग किंवा घरफोडी अशा घटना घडत होत्या. त्यामुळे अशा कालखंडात आरोपीनां जेरबंद करण्याचे आव्हान पोलीस यंत्रणांसमोर उभे ठाकले होते. अखेर मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यामध्ये मोहिन अहमद आणि रफिक या दोन आरोपींना पकडले. हे आरोपी नागरिकांकडून अमेरिकन डॉलर दाखवून तुम्ही भारतीय चलन द्या, मी पैसे वाढवून देतो असे सांगत नागरिकांना फसवत होते. (Manpada police arrest two for cheating by showing US dollars)
हे देखील पहा -
याची तक्रार दाखल होताच पोलिसांनी शोध सुरू केला. गुप्तहेर आणि सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहिन अहमद एका पायाने अधु असून त्याने लाकडी पाय लावला आहे. तसेच मानपाडा हद्दीतील वेगवेगळ्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांनासुद्धा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी रिक्षा, मोबाईल, बाईक, मंगळसूत्र, पैसे आणि डॉलर हस्तगत केले असून हा एकूण ४ लक्ष ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आहे. शुभम बोराडे, आकाश पोळे, आकाश शर्मा, रफिक शेख, मोहीन अहमद अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व चोरटे हे सराईत गुन्हेगार असल्याने पोलीस त्यांचा पुढील तपास करत आहेत.
या सर्व आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आल्याची माहिती डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जे.डी. मोरे यांनी दिली आहे. मानपाडा पोलिसांच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल भीसे, पोलीस हवालदार कदम, पोलीस हवालदार काटकर, पोलीस नाईक संजू मिसाळ, पोलीस नाईक घूगे, पोलीस शिपाई ताराचंद सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई करत आरोपींना जेरबंद केलं आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.