लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं पडलं महागात; गर्लफ्रेंडने दिला क्रूर मृत्यू
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं पडलं महागात; गर्लफ्रेंडने दिला क्रूर मृत्यूSaam Tv

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं पडलं महागात; गर्लफ्रेंडने दिला क्रूर मृत्यू

संबंधित व्यक्तीचा अर्धवट जळलेला मृतदेह 10 दिवसांपूर्वी सापडला होता; मात्र हा अर्धवट जळलेला मृतदेह नेमका कोणाचा आहे, याबद्दलचा शोध सुरू होता. तपासादरम्यान हा गुन्हा उघडकीस आला आहे.
Published on

नवी दिल्ली - लिव्ह-इनमध्ये रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडने आपल्या बॉयफ्रेंडला जाळून मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना फरीदाबादमध्ये घडली असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित व्यक्तीचा अर्धवट जळलेला मृतदेह 10 दिवसांपूर्वी सापडला होता; मात्र हा अर्धवट जळलेला मृतदेह नेमका कोणाचा आहे, याबद्दलचा शोध सुरू होता. तपासादरम्यान हा गुन्हा उघडकीस आला आहे.

या प्रकरणी आरोपी गर्लफ्रेंडला पोलिसांनी अटक केली आहे. मृत व्यक्ती वल्लभगडमधल्या भाटिया कॉलनीतली असल्याचे तपासात उघड झाले आहे. मृत व्यक्तीचे नाव पवन असे आहे. लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या त्याच्या गर्लफ्रेंडवर त्याला जाळून मारल्याचा आरोप आहे.16 ऑक्टोबरला पवन  सकाळी ६ वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता आणि तो परत आला नाही, तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या मोठ्या भावाने 18 ऑक्टोबर रोजी वल्लभगड पोलीस ठाण्यात दिली होती.

हे देखील पहा -

पावनच्या मोठ्या भावाला त्याची एका महिलेसोबत मैत्री असल्याची माहिती असल्याने त्याने त्या महिलेला फोन करून चौकशी केली. तेव्हा तिने सांगितले, की तो तिच्याकडे आला होता पण त्याच दिवशी सायंकाळी चारच्या सुमारास तिथून निघून गेला.

आरोपी महिला ही मूळची पंजाबमधली असल्याची माहिती चौकशी दरम्यान उघड झाली आहे. तिचा पती फरीदाबाद इथल्या एका खासगी कंपनीत नोकरीला होता. ब्लड कॅन्सरमुळे 2018 साली या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला. 2019 साली आरोपी महिला तिच्या पतीच्या जागी नौकरीवर लागली. त्याच वर्षी तिची ओळख पवनशी झाली. त्यानंतर दोघांचं प्रेम जमलं आणि ती दोघंही लिव्ह-इनमध्ये राहू लागले.

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं पडलं महागात; गर्लफ्रेंडने दिला क्रूर मृत्यू
नागपूरात एसटी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

दरम्यान, तिच्या 13 वर्षांच्या मुलीकडे पवन हा वाईट नजरेने पाहू लागल्याचे तिने पोलिसांना तपासात सांगितले. त्यानंतर या विषयावरून  दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर भांडणात झाले. त्यानंतरच त्या महिलेने पवनच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी तिने बाटलीत पेट्रोल आणले. महिलेने आधी 16 ऑक्टोबर रोजी  पवनला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि त्यानंतर त्याला ऑटोमधून घेऊन  बराच वेळ फिरत राहिली. रात्री 10.30 वाजता सेक्टर 75 मधल्या एका सुनसान जागी नेऊन तिने मध्यरात्री 12.30च्या दरम्यान पवनवर पेट्रोल ओतून त्याला जाळलं आणि तिथून पसार झाली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com