Manoj Jarange Patil: मराठा बांधवांमध्ये खदखद, लोकसभा निवडणुकीत समाज रोष व्यक्त करेल.. मनोज जरांगेंचा महायुतीला इशारा

Maratha Reservation News: राज्यातील सरकारने आम्हाला सहा जूनपर्यंत आरक्षण नाही दिलं तर विधानसभा निवडणुकीला संपूर्ण महाराष्ट्र काबीज करणार असा इशारा देखील मनोज जरागे पाटील यांनी राज्यातील महायुती सरकारला दिला आहे.
Maratha Aandolak Manoj Jarange Patil Will Visit in Pune Next Week For Inauguration Of Maratha Samaj Office At Baner
Maratha Aandolak Manoj Jarange Patil Will Visit in Pune Next Week For Inauguration Of Maratha Samaj Office At BanerSaam Tv

Manoj jarange Patil Press Conference:

राज्यातील मराठा समाजाच्या मनात खदखद आहे. मराठा समाजाला आरक्षण देतो असे सांगून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी धोका दिला. याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाज आपला रोष व्यक्त करेल असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) हे आज पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्या दरम्यान मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या वेगवेगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी भेट घेत आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी थेट राज्य सरकारवर निशाणा साधला.

काय म्हणाले जरांगे पाटील?

"माझा काही राजकीय मार्ग नसल्याने मी त्यापासून अलिप्त आहे आणि मी कोणताही उमेदवार दिला नाही तसेच कुणाला पाठिंबाही दिलेला नाही. मात्र समाजाने ही निवडणूक हातात घेतली आहे. समाजाला ज्याला पाडायचा आहे त्याला पाडेल, इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा राज्याचा आहे. आमच्या प्रश्न दिल्लीचा नाही, असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

Maratha Aandolak Manoj Jarange Patil Will Visit in Pune Next Week For Inauguration Of Maratha Samaj Office At Baner
Political News : महायुतीच्या मेळाव्याला भाजपच्या कोल्हेंची गैरहजेरी; विखेंसोबत एकाच मंचावर येण्याचे टाळले

सहा जूनपर्यंत आरक्षण देण्याची मागणी..

"मराठा समाज हुशार आहे. मात्र माझा नाईलाज आहे. निवडणुकीसारखी कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक करायला हवी. सात महिन्यात मी गृहमंत्री आणि सरकारचा एकही डाव यशस्वी होऊ दिला नाही. त्यांचा डाव यशस्वी झाला असता तर मी समाज एकत्र केला आणि मीच समाजाला मातीत घातलं असं झालं असतं. जर राज्यातील सरकारने आम्हाला सहा जूनपर्यंत आरक्षण नाही दिलं तर विधानसभा निवडणुकीला संपूर्ण महाराष्ट्र काबीज करणार असा इशारा देखील मनोज जरागे पाटील यांनी राज्यातील महायुती सरकारला दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Aandolak Manoj Jarange Patil Will Visit in Pune Next Week For Inauguration Of Maratha Samaj Office At Baner
Political News : महायुतीच्या मेळाव्याला भाजपच्या कोल्हेंची गैरहजेरी; विखेंसोबत एकाच मंचावर येण्याचे टाळले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com