
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन, आज पाचवा दिवस.
मुंबई उच्च न्यायालयात आज दुपारी ३ वाजता सुनावणी होणार.
कोर्टाचा निकाल आंदोलनावर मोठा प्रभाव टाकू शकतो.
आझाद मैदान आणि मुंबईतील वाहतुकीवर आंदोलनाचा मोठा परिणाम.
Maratha Protets Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील आणि मराठा यांच्या यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. सोमवारी कोर्टात आंदोलनाबाबत सुनावणी झाली होती, कोर्टाकडून मुंबईतील परिस्थितीवर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना गाड्या मुंबईबाहेर लावण्याचे आवाहन केले होते. आज या प्रकरणावर पुन्हा एकदा ३ वाजता सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. (Maratha Reservation Protest)
मुंबई उच्च न्यायालयात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनावर सुनावणी होणार आहे. दुपारी तीन वाजता सुनावणीला सुरूवात होणार आहे. सोमवारी कोर्टाने राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती गेली होती. आज कोर्टात याबाबत निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या आझाद मैदान परिसरात आंदोलक मोठ्या प्रमाणात आहेत. त्याची गैरसोय होऊ नये म्हणून अजून एक मंडप बांधला जात आहे. त्याशिवाय मुंबईच्या रस्त्यावर असणाऱ्या गाड्या पार्किंगमध्ये लावण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईमधील वाहतूक कोंडी तात्काळ सुटत असल्याचे दिसतेय.
मराठा आरक्षण आंदोलनावर आज पुन्हा उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्यात तणावाचं वातावरण आहे. कोर्टाचा आजचा निर्णय आंदोलनाच्या दिशेवर मोठा परिणाम करू शकतो. कोर्टाच्या निकालानंतर मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतील, याकडेही राज्याचे लक्ष लागलेय. सोमवारी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी कोर्टाच्या निर्णयावर कोणताही आक्षेप घेतला नव्हता. त्यांनी कोर्टाचा निर्णयानंतर मराठा आंदोलकांना पार्किंगमध्ये गाड्या लावण्याचे आवाहन केले होते. आज कोर्टामध्ये काय घडतेय? कोर्ट काय निकाल देताय., मनोज जरांगे पाटील त्यावर काय बोलणार? याबाबतची चर्चा सुरू आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. राज्य सरकारकडून पाच हजार आंदोलकांना परवानगी देण्यात आली आहे. मुंबईमध्ये हजारोंच्या संख्येने आंदोलक धडकले आहेत. मुंबईच्या रस्त्यावर आंदोलकांची मोठी गर्दी झाली आहे. रस्ते, रेल्वे फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत असल्याचे कोर्टात वकिलाने सांगितले होते. त्यावर कोर्टाकडून आज दुपारपर्यंत गर्दी कमी कऱण्याचे आवाहन केले होते. आज कोर्टात सुनावणी होणार आहे, त्यामध्ये काय निकाल लागतोय? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.