Manipur News: ईशान्य राज्यातील मणिूर राज्य पुन्हा एकदा पेटले आहे. मणिपुरातील हिंसाचार अद्याप सुरूच आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मणिपूर दौऱ्यादरम्यान, गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा हिंसाचार उफळला. या धुमसत्या मणिपुरात वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार तर काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना देखील घडल्या आहेत. एका भाजप कार्यालयाची देखील तोडफोड करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
मणिपुरात ३ मे रोजी पहिल्यांदा हिंसाचार झाला. त्यानंतर सातत्याने हिसांचाराच्या घटना घडत आहेत. मणिपुरात गेल्या ५८ दिवासांपासून हिसांचाराच्या घटना घडत आहेत. या दोन गटाच्या हिसांचारात आतापर्यंत राज्याचं कोट्यवधीचं नुकसान झालं आहे.
मणिपुरात आतापर्यंत केंद्रीय मंत्र्यांनी पाहणी देखील केली आहे. त्यांनी या भागातील वेगवेगळ्या गटाचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते राहुल गांधीही देखील मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत. काल राहुल गांधींना मणिपूर पोलिसांनी रोखल्याने काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारवर आगपाखड केली.
दरम्यान, गुरुवारी पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना घडली. मणिपुरातील कंगपोकली जिल्ह्यात आंदोलक आणि जवान एकमेकांना भिडल्याचाही प्रकार घडला. या आंदोलकांकडून गोळीबार देखील झाला असल्याचे जवानांचं म्हणणं आहे. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी देखील प्रत्युत्तरात गोळीबार केला.
या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना हरओथेल गावातील आहे. उशिरा रात्रीपर्यंत हा हिंसाचार पाहायला मिळाला.
या आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांना रोखल्याने हा जमाव भडकला. त्यानंतर या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्याचबरोबर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला.
मणिपुरातील एका भाजप कार्यलयाजवळ आंदोलक उभे होते. या भाजप कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात आंदोलक जमाव जमा झाला होता. ख्वायरमबंद बाजारात काही लोकांची धरपकड करण्यासाठी पोलीस आल्याने काही लोकांनी टायर जाळले. यावेळी आंदोलकांनी भाजप कार्यालयाची तोडफोड केली. सध्या स्थिती नियंत्रणात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.