पुणे : येरवडा कारागृहात Yerawada Jail दोन वर्षाची शिक्षा भोगूनही, मागील तीन महिन्यांपासून मायदेशी परत जाण्यासाठी मंडोल दांपत्य Mandol couple धपडत होत, मात्र साम टीव्ही SaamTV च्या पाठपुराव्याने तसेच फरसखाना पोलिसांनी Faraskhana Police केलेल्या धडपडीमुळे उजल आणि मजीदा मंडोल दांपत्य आज अखेर त्यांच्या मायदेशी परत जात आहेत. मागील तीन महिन्यां पासून मंडोल दांपत्य फरसखाना पोलिस ठाण्यामध्ये आपल्या कायदेशीर प्रत्यापणाची अविरत प्रतिक्षा करत होते, न्यायालयाने मायदेशी परत जाई पर्यंत पोलिस निगराणी मध्ये राहण्याचे आदेश मंडोल दांपत्याला दिले होते. त्यामुळे गेल्या तिनं महिन्या पासून मंडोल दांपत्य फरसखाना पोलिस ठाण्या मध्येच मुक्काम करून होते. Mandol couple legal transplant to Bangladesh
हे देखील पहा-
फरसखाना पोलिस स्टेशनला जणू त्यांनी आपलं तात्पुरतं घरच केलं होतं. पोलिसांनीही त्यांना पोलीस स्टेशन मध्ये आपल्या कुटुंबातील सदस्य प्रकार सांभाळलं होत. मात्र बांगलादेश Bangladesh असेंबलीच्या Assembly लाल फितीच्या कारभारामुळे मंडळ दांपत्य गेल्या तीन महिन्यापासून फरसखाना पोलिसांच्या नजरकैदेत होते. आज अखेर दोन वर्षां नंतर मायदेशी फरत जाण्यास संधी मिळाल्याने मंडोल हे दांपत्याचे डोळे आनंदाने पाणावले होते.
2019 मध्ये एका एजंटने Agent भारतात नोकरी Job मिळवून देतो म्हणून मंडोल दांपत्याला भारतात बेकायदेशीर प्रवेश Illegal Entry मिळवून दिल. भारतात आल्यावर एजटने उजलला न सांगता मजिदाला परस्पर पुण्यातील बुधवार पेठेत देहविक्रीचा धंदा करण्यासाठी विकल उजल आणि मजीदा यांनी देहविक्री करण्याच्या धंद्याला विरोध केल्याने, एजटने त्यांना पोलिस कारवाईत अडकवल होत आणि त्यात त्यांनी दोन वर्ष कारावासाची शिक्षा देखिल झाली. शिक्षा भोगल्या नंतर उजल आणि मजीदा मंडोल दांपत्याला त्यांच्या मायदेशी परत पाठविण्याची जबाबदारी न्यायालयाने फरसखाना पोलिसांनकडे सोपवली आहे. आज फरसखाना पोलीस मंडोल दांपत्याला बांगलादेश बॉर्डर वर सोडण्यासाठी स्वतः जात आहेत.
उजल आणि मजीदा मंडोल दांपत्य बांगलादेश मधिल खुलना शहारा लगत असलेल्या एका छोट्या गावात राहतात, त्यांची तीन मूल सध्या बांगलादेश मध्ये त्यांच्या आजीकडे वास्तव्यास आहेत. भारतात रोजगार मिळवण्यासाठी त्यांनी बेकायदेशीर रित्या प्रवेश केला होता, मात्र बेकायदेशीर प्रवेशामुळे त्यांना रोजगारा ऐवजी कारागृहाची शिक्षा मिळाली होती.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.