शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसल्याचे एक उदाहरण दाखवा; मी राजकारण सोडेण, संजय राऊतांचे, चंद्रकांत पाटलांना चॅलेंज!

शिवसेना पक्ष महाविकास आघाडी पक्षातील प्रमुख पक्ष आहे. पक्षातील कार्यकर्त्यांवर जर सुडापोटी कुठे कारवाई होत असेल तर त्यात लक्ष घालावेच लागेल.
शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसल्याचे एक उदाहरण दाखवा; मी राजकारण सोडेण, संजय राऊतांचे, चंद्रकांत पाटलांना चॅलेंज!
शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसल्याचे एक उदाहरण दाखवा; मी राजकारण सोडेण, संजय राऊतांचे, चंद्रकांत पाटलांना चॅलेंज!सागर आव्हाड
Published On

पुणे : पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर येथे शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा Shivsena Workers Meet पार पडला या मेळाव्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत Sanjay Raut हे उपस्थित होते. शिवसेना पक्ष महाविकास आघाडीMVA पक्षातील प्रमुख पक्ष Main Party आहे. पक्षातील कार्यकर्त्यांवर जर सुडापोटी कुठे कारवाई होत असेल तर त्यात लक्ष घालावेच लागेल. जिल्ह्याचे नेते पवार साहेब आहेत. स्थानिक शिलेदारांनी संयम दाखवावा, संसार आमच्याबरोबर करायचा आहे. तसेच प्रत्येकाने संयमाने वागावे असा सल्ला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कार्यकर्ता मेळाव्यात दिला.Sanjay Raut's challenge to Chandrakant Patil

हे देखील पहा-

राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. या सरकारचे निर्माते शरद पवार Sharad Pawar हे पुणे जिल्ह्याचे आहेत. पुणे जिल्ह्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी खदखद आहे. अनेक ठिकाणी सुडापोटी गुन्हे दाखल होत असल्याचे पहावयास मिळत असून असे प्रकार जर कुठे घडत असतील तर ते आघाडीचे प्रश्न समजून तिथे लक्ष घालण्यात येईल. कार्यकर्त्यांनी तसेच इतरांनी देखील आघाडी धर्म समजून संयमाने वागावे असा सल्ला यावेळी राऊतांनी कार्यकर्त्यांना दिला. शिरूर लोकसभा मतदार संघातShirur Lok Sabha constituency शिवसेना कार्यकर्त्यांना बळ दिले जाणार असून प्रत्येक कार्यकर्त्याने ही संघटना मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे, बैलगाडा शर्यतींबाबत Bullock cart races माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील Shivajirao Adhalrao Patil हे यापुढे लढ्याचे नेतृत्व करणार असून यासाठी जनआंदोलन उभे करून सरकार व न्यायालय यावर दबाव आणू.

शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसल्याचे एक उदाहरण दाखवा; मी राजकारण सोडेण, संजय राऊतांचे, चंद्रकांत पाटलांना चॅलेंज!
नारायण राणेंनी चिपी विमानतळासाठी 14 वर्ष काहीही केलं नाही - खा. विनायक राऊत

दरम्यान भाजप वरती टीका करताना ते म्हणाले की, आम्ही १०५ आमदार घरी बसवले त्यामुळेच मोठा जळफळाट होतो आहे. स्वप्नात हि टीका केली जाते. चंद्रकांत पाटील हे हरिश्चंद्राचे अवतार असून पवार साहेबांनी पाठीत खंबीर खुपसला असे ते सांगतात मग पवार साहेबांनी पाठीत खंजीर खुपसला याचे एकतरी उदाहरण दाखवा राजकारण सोडून देईल असे थेट आव्हानच त्यांनी यावेळी केले. आम्ही समोरून वार करतो, पाठीत खंजीर खुपसणे हे आमच्या रक्तात नाही असे ते म्हणाले.

तसेच सरकार मध्ये सगळ्याचे एकमेकांशी चांगले आहे.वर काहीच भांडण नाही मात्र स्थानिक पातळीवर वाद असतात.त्यामुळे संयमाने वागा.प्रत्येकाची नोंद घेतली जात आहे. तुम्ही आपापसात लढू नका.शिवसैनिक म्हणून वागा,काम दाखवा,शिवसेना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या मुळेच आजपर्यंत तरली आहे.त्यामुळेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे टॉप चे नेते ठरले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com