Mumbai Crime : मुंबईत ५२ लाखांचे अंमली पदार्थ बाळगणाऱ्या आरोपीला अटक; मालवणी पोलिसांनची कारवाई

Mumbai Crime News in Marathi : आरोपीला 8 मार्चपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलीय.
Malvani Police station
Malvani Police station Saam TV

संजय गडदे

Mumbai Crime News : मुंबईच्या मालवणी पोलिसांनी 48 वर्षीय ड्रग्स विक्रेत्याला अटक केलीये. त्याच्याकडून तब्बल बावन्न लाख 15 हजार रुपये किंमतीचं ड्रग्स जप्त केलंय. दरम्यान या आरोपीला 8 मार्चपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलीय. मालवणी पोलिसांनी सापळा रचून आरोपीला वेलांकानी सोसायटी मालवणी गाव परिसरातून अटक केलीये लाला मोहम्मद हबीब शेख (४८ वर्षे) अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Latest Marathi News)

Malvani Police station
Ahmednagar News: प्रांत कार्यालयाला घातली कांद्याला माळ; दर घसरल्‍याने राष्‍ट्रवादीचा रास्‍ता रोको

मिळालेल्या माहितीनुसार मालाड पश्चिमेकडील मालवणी गाव परिसरातील वेलंकनी सोसायटी जवळ एक व्यक्ती एमडी ड्रग्स विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त बातमीदाराकडून मालवणी पोलिसांना (Police) माहिती मिळाली होती.

Malvani Police station
ED Raids: मोठी बातमी! महाराष्ट्रात ईडीची कारवाई; मुंबई, नागपुरमध्ये १५ ठिकाणी छापेमारी

यानुसार मालवणी पोलिसांनी सापळा रचला. गस्तीवर असलेल्या पोलिसांना वेलंकनी सोसायटी जवळील व्यक्तीचा हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दोन पंचांच्या समक्ष त्याची झाडाझडती केली असता त्याच्याकडे 103 ग्राम वजनाचे गरद व 03 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्स आढळून आले. त्यामुळे त्याच्यावर एन डी पी एस नुसार मालवणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com