Jitendra Awhad: आव्हाडांच्या कुटुंबियांना धमकावणाऱ्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई; उदय सामंतांची विधीमंडळात घोषणा

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना धमकी देण्याची महेश आहेर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSaam TV

Mumbai News : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियाना धमकवणारे ठाणे महानगर पालिकेतील अधिकारी महेश आहेर यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरू असेपर्यंतत त्यांचा कार्यभार काढून घेतला जाईल, असं उदय सामंत यांनी विधिमंडळात घोषणा केली.

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना धमकी देण्याची महेश आहेर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी देखील महेश आहेरवर विधानसभेत गंभीर आरोप केले होते. महेश आहेर यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप करण्यात आले होते. (Political News)

Jitendra Awhad
Bhaskar Jadhav : शिवसेनेची तोफ भास्कर जाधव विधानसभेत दिसणार नाहीत? पायऱ्यांना नमस्कार करुन निघाले; नेमकं काय घडलं? VIDEO

संबधित अधिकाऱ्याच्या ज्या ऑडिओ क्लिप समोर आल्या आहेत आणि जे आरोप झाले आहेत त्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहे. या प्रकरणाची चौकशी 30 दिवसात पूर्ण करुन योग्य ती कारवाई केली जाईल, असंही उदय सामंत म्हणाले

Jitendra Awhad
Maharashtra Politics: विधानसभेत आदित्य ठाकरेंच्या लग्नाची चर्चा! फडणवीसांच्या कोपरखळीला आदित्य ठाकरेंचा विनोदी पलटवार

अनिल परब यांनी देखील महेश आहेरवर गंभीर आरोप केले. महेश आहेर हा माणूस दोन वेळा निलंबित आहे. तरी याला चांगल्या ठिकाणी नियुक्ती मिळते. या माणसाला आमच्या पेक्षा जास्त बॉडीगार्ड आहेत. या अधिकाऱ्याची इतकी वर्ष ठाण्यात एकाच जागी नियुक्ती कशी? अशी विचारणा अनिल परब यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com