संविधानातील अपेक्षित भारत घडवण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी लागेल : डॉ.बाबा आढाव

सर्वांगीण परिवर्तनाचा विचार पुढे आणला गेला पाहिजे असे डाॅ. बाबा आढाव यांनी नमूद केले.
Baba Adhav
Baba AdhavSaam tv
Published On

सातारा : आज देशाच्या संविधानात पुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. राजनीतीची चमत्कारिकता ही आपण अनुभवत आहोत एक दिवस शरद पवार (sharad pawar) मोदींशी (narendra modi) चर्चा वार्तालाप करतात तर दुसर्‍या दिवशी त्यांच्या घरावर चपलांचे हार भिरकावले जातात. काेरोनापेक्षाही (corona) वैचारिक विषमता भयानक आहे. आपल्याला अपेक्षित संविधानातील भारत घडवायचा असेल तर जे आजपर्यंत झालेल्या चळवळीचे आधार आहेत त्यांचीच मदत घेऊन घडवण्याची गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक विचारवंत डॉ .बाबा आढाव (baba adhav) यांनी केले.

महाराष्ट्राचे ज्येष्ठ प्रबोधनकार सत्यशोधक प्रार्थना समाजाचे प्रणेते दलित मित्र रा.ना.चव्हाण यांच्या २९ व्या स्मृतिदिनी २४ वा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार पुणे येथील श्रमिक पत्रकार संघाच्या इमारतीमध्ये कलबुर्गी -कर्नाटक येथील प्राचार्य भालचंद्र शिंदे यांना नुकताच प्रदान करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून डॉ .बाबा आढाव बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.सुनीलकुमार लवटे, डॉ.सदानंद मोरे, रा.ना.चव्हाण प्रतिष्ठानचे विश्वस्त सतीश कुलकर्णी, रमेश चव्हाण,पुरस्कार प्राप्त करणारे प्राचार्य भालचंद्र शिंदे ,त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.संध्या शिंदे,प्रा.राम जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ बाबा आढाव म्हणाले सत्यशोधक चळवळीचा इतिहास का रखडला याचा विचार करा उपेक्षा हा शब्द खटकतो आहे. कृतज्ञता व्यक्त करताना चांगले म्हणण्याची वेळ येताना जात आडवी येते. ज्यांनी ही व्यवस्था निर्माण केली त्यांनाच आम्ही आमच्या आजही डोक्यावर घेतले आहे. भाषिक वाद किरकोळ आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी (chhatrapati shivaji maharaj) तलवार दिली. महात्मा फुल्यांनी पाटी-पेन्सिल दिली आणि डॉ. आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला. हे जर झाले नसते तर आजचा सुधारलेला महाराष्ट्र आपण पाहू शकलो नसतो. आजवर झालेल्या दलित ,सत्यशोधक आणि ब्राह्मण चळवळींचा ही इतिहास पुढे येणे हे महत्त्वाचे आहे. जे अद्याप अंधारात आहे ते पुढे आलेले नाही. सत्यशोधक चळवळ म्हणजे ब्राह्मणांना शिव्या देणे हाच यांचा धंदा होता. अशा विचारांच्या हीन परिस्थितीत राज्यघटना शिल्लक राहणार का हा प्रश्न पुढे येतो. मूल्यांचा स्वातंत्र्य, बंधुता, समता ,बुद्धिप्रामाण्यवाद, विज्ञानाधिष्ठित आता या मूल्यावर चांगले म्हणायचे असले तरी जात आडवी येते अशी विचित्र व्यवस्था बनवली गेली आहे. कुठेही जात आडवी येते आहे असे डाॅ. आढाव यांनी नमूद केले.

Baba Adhav
FIH Women's Junior World Cup: इंडिया हरली; जर्मनी विरुद्ध नेदरलँड अंतिम लढत

आपण विज्ञाननिष्ठा करत नाही. काेरोनाच्या काळामध्ये जात होती का? काेराेना आला की जात आडवी आली का? आता विज्ञानाने निर्माण केलेले संस्कार शिकून मांडणी करून अभ्यास करून पुढे जावे लागेल. आज अभ्यासक्रमाचे काम बाजूला राहिले .पाटी-पेन्सिल आपली मात्र त्यांची सरस्वती, शारदा पुढे आणली गेली आणि निखळ सत्य पुढे आणून मांडण्याचे काम केले .मात्र यांची उपेक्षा झाली असे म्हणणे हे आपला कमीपणा सांगत असल्याचे लक्षण आहे.

Baba Adhav
Satara: महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठी घेतलेले पैसे गेले कुठं? शिवेंद्रसिंहराजे
maharshi vitthal ramji shinde award presented to principal bhalchandra shinde with the hands of dr baba adhav.
maharshi vitthal ramji shinde award presented to principal bhalchandra shinde with the hands of dr baba adhav.saam tv

इतिहास जो घडला ते पुढे आणले गेले नाही सर्वांगीण परिवर्तनाचा विचार पुढे आणला गेला पाहिजे आणि संविधान वाचण्याची चळवळ जी सत्यशोधक चळवळीने याबाबत उडी घेतली तो मोठा आधार असेल .मतभेद झालेतर तेही स्पष्ट असावेत. आज राजनीतिची चमत्कारिक कथा पाहायला मिळत आहे. एक दिवस शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची भेट होते, तर दुसर्‍या दिवशी चपलांचे हार बंगल्यावर पडतात. काेरोना पेक्षाही भयानक अवस्था असून भारतात अपेक्षित संविधानामध्ये घडवायचा असेल तर त्यासाठी या चळवळीचा आधार घेत आपल्याला पुढे जावे लागेल असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com