Maharashtra Political Reaction: आम्ही देखील बांगड्या भरल्या नाहीत; दिवाळीत राजकीय फटाके फुटले

Maharashtra Political Reaction: शाखेवरून ठाकरे गटाचे नेते खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना ललकारलं आहे. या सर्व नेत्यांच्या झणझणीत प्रतिक्रियांमधून दिवसभराचं राजकारण समजून घेऊयात.
Maharashtra Political Reaction
Maharashtra Political ReactionSaam tv
Published On

Maharashtra Political Reaction:

राज्यभरात दिवाळीची धामधूम सुरु आहे. तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील मुंब्र्यात शिवसेना शाखेवर बुलडोझर फिरवल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. मुंब्रा येथील शिवसेना शाखेवर बुलडोझर फिरवल्यानंतर उद्धव ठाकरे हे घटनास्थळी भेट देणार आहेत. या शाखेवरुन दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. या शाखेवरून ठाकरे गटाचे नेते खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना ललकारलं आहे. या सर्व नेत्यांच्या झणझणीत प्रतिक्रियांमधून दिवसभराचं राजकारण समजून घेऊयात. (Latest Marathi News)

मुंब्रा येथील शिवसेना शाखेबाहेर दोन्ही गटाच्या नेत्यांनी बॅनरबाजी केली आहे. मुंब्रा येथील या शाखेला उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. या वादानंतर पोलिसांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवल्या आहेत. या वादामुळे मुंब्रा या शहराला छावणीचं स्वरुप निर्माण झालं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Political Reaction
Sharad Koli News: मुंब्र्यातील राड्याची धग सोलापुरात.. शरद कोळींचा शिंदे गटाला थेट इशारा, म्हणाले; तुम्हाला दिवसा...

राजन विचारे यांची प्रतिक्रिया

मुंब्रा येथील शाखेवर बुलडोझर फिरवण्यावरून खासदार राजन विचारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'पोलिसांच्या बंदोबस्तात शाखा पाडण्यात आली आहे. दादागिरी अशी जर चालत असेल तर आम्ही देखील बांगड्या भरलेल्या नाहीत. शाखेचा टॅक्स आमचे पदाधिकारी भरत आहेत. पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. हे मिंध्ये सरकार थोडे दिवस उरलं आहे, अशा शब्दांत राजन विचारे यांनी टीका केली आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया

मुंब्य्रात शाखेवर बुलडोझर फिरवल्यानंतर उद्धव ठाकरे हे घटनास्थळी भेट देणार आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांना न येण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, तरीही उद्धव ठाकरे मुंब्य्राकडे निघाले आहेत. त्यादरम्यान संजय राऊत यांनी हिंमत असेल अडवून दाखवा, असं म्हटलं.

संजय राऊत यांच्या विधानावर भाष्य करताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, 'मुंब्रा येथील बॅनर कोणी फाडले याची चौकशी होईलच. पण आडवायचा विषय असेल तर आमची सेना काही कमी नाही.

Maharashtra Political Reaction
Radhakrishna Vikhe Patil: 'नाचता येईना अंगण वाकडे'; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बाळासाहेब थोरातांवर पलटवार

'फालतूचे चॅलेंज त्यांनी करू नये. आम्ही नामर्द नाही. दसरा मेळाव्यासाठी आम्ही दोन पाऊल मागे घेतले. जर अशाप्रकारे बोलत असतील तर आमची तयारी कशात पण आहे, असा इशारा संजय गायकवाड यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com