डोंबिवली - रेल्वे पोलीस ठाणे अंतर्गत असलेले महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या दोन जवानांनी आज सकाळी एका महिलेचे प्राण वाचवले आहेत. सदर घटना ही सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. डोंबिवली रेल्वे पोलीस ठाणे अंतर्गत असलेले महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या दोन जवानांनी आज सकाळी एका महिलेचे प्राण वाचवले आहेत अशी माहिती डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली.
हे देखील पहा -
आज सकाळी 9 वाजून 17 डोंबिवली रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 5 येथे एक महिला चालत्या लोकल मध्ये चढायला गेली आणि तिचा तोल गेला. दरम्यान तिथे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या विवेक पाटील आणि किरण राऊत या दोन जवानांनी प्रसंगवधान राखत तिला त्वरित बाजूला घेत तिचे प्राण वाचविले.
सदर महिलेने महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या त्या दोन जवानांचे, रेल्वे पोलिसांचे आणि आरपीएफचे आभार मानले आहेत. त्या दोन जवानांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तर चालती गाडी पकडताना प्रवाशांचा तोल जाऊन अपघात होण्याचे प्रमाण जास्त असते. आशा अनेक घटना देखील घडतात. मात्र सुरक्षितता आणि आपल्या जीवाची पर्वा करत प्रवाशांनी चालती गाडी पकडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांनी केले आहे.
एकीकडे महिलेचा जीव वाचविण्यात पोलिसांना यश आले असले तरी दुसरीकडे डोंबिवली रेल्वे स्थानकात लोकल मध्ये चढताना केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटल मधील कर्मचारी नामदेव गावित (वय 56) यांचे निधन झाले आहे. ड्युटी संपवून ते कल्याण येथील घरी निघाले असता डोंबिवली प्लॅट फॉर्म क्रमांक 5 वर 1.03 ची कल्याण दिशेला जाणारी लोकल पकडताना त्यांचा तोल गेला नी हा अपघात घडला. त्यांना उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.