दादांना घातला थेट क्रेनला लटकून हार; पिंपरीत कार्यकर्त्याचा भन्नाट स्टंट, नेत्याला इम्प्रेस करण्यासाठी काय पण

Ajit Pawar Greeted By Supporter Hanging From Crane: कार्यकर्ता आपल्या नेत्याला इम्प्रेस करण्यासाठी कधी, कुठं, काय करील सांगता येत नाही.... कारण एका जिगरबाज कार्यकर्त्यानं अजित पवारांचं पिंपरीत अनोखं स्वागत केलंय..
An NCP supporter hangs from a crane to garland Ajit Pawar during a high-voltage roadshow in Pimpri.
An NCP supporter hangs from a crane to garland Ajit Pawar during a high-voltage roadshow in Pimpri.Saam Tv
Published On

निवडणुकीच्या प्रचाराचा चढला रंग

अन् दादाच्या कार्यकर्त्याचा भलताच ढंग

तिकडं उडाला प्रचारात फटाक्याचा बार

अन् दादाच्या गळ्यात थेट क्रेनला लटकून घातला हार

कार्यकर्ता ती कार्यकर्ता कवा, कधी अन् कसं काय करील याचा नाय नेम... आता हीच बघा दादा सकाळपासनं पायला भिंगरी बांधून प्रचाराला लागल्यात अन् ह्यो कार्यकर्ता लटकलाय थेट क्रेनला... ती बी दादाच्या स्वागतासाठी गुलाबी गाडीतनं दादाचा रोडशो जोमात सुरु... अन् कार्यकर्त्याला चिंता दादाचं स्वागत कसं करु... वाघानं लढवली शक्कल अन् मागवली क्रेन. गुलाबी फेटा डोक्याला बांधला. नेत्यावानी पांढरी पँट अन् पांढरा शर्ट घातला... हातात घेतला हजार पाचशेचा हार.... अन् लटकला क्रेनला...

दादाचा ताफा जवळ आल्यावर गड्यानं क्रेनला लटकून गळ्यात घातला हार... दादा बी खूश अन् कार्यकर्ता बी खूश

यंदा तिकीट मिळालं नसलं तर पुढच्या वेळेस या स्टंटनं तरी तिकीट मिळो ही अपेक्षा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com