

शिवसेना नेते अखिल चित्रे यांनी भाजप प्रवक्त्यांना थेट इशारा दिला
उद्धव ठाकरे यांच्यावर होणाऱ्या टीकेवरून दिला इशारा
'शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहू नका', असे ते म्हणाले
भाजपच्या प्रवक्त्यांवर त्यांनी जहरी टीका केली
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते अखिल चित्रे यांनी भाजपच्या अधिकृत प्रवक्त्यांना थेट इशारा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी भाजप प्रवक्त्यांनी टीका करायची असल्यास ती जरूर करावी, मात्र उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना ‘आब राखावा’, असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.
अखिल चित्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'तुम्हाला टीका करायचीच आहे, बिनदिक्कत करा. आम्हीही जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत. पण आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करताना मर्यादा पाळा. शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहू नका.', असा थेट इशारा त्यांनी दिला.
तसेच, अखिल चित्रे यांनी भाजपच्या काही प्रवक्त्यांवर जोरदार टीका केली. 'पक्षाच्या बौद्धिक बैठकीतून पसरवले जाणारे विचार हे महाराष्ट्रात पसरणाऱ्या ड्रग्सइतकेच घातक” असल्याचा आरोप केला. 'अशा अमली बौद्धिकांपासून दूर राहा, नाहीतर एक दिवस वेडेपिसे व्हाल.', असा टोला त्यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांच्याविरोधात सातत्याने होत असलेल्या टीकेमुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे अखिल चित्रे यांनी सांगितले. “जशास तसे उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत,” असे सांगत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.