Amol Kolhe: संघर्षाच्या काळात आले नाही, आता का येत आहेत; अमोल कोल्हेंचा अजित पवार गटाच्या आमदारांना सवाल

Shirur Loksabha Election Result 2024: 'संघर्षाच्या काळात आले नाही, आता का येत आहेत.', असा सवा अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटाच्या आमदारांना केला आहे. या सर्वांबाबत पक्ष निर्णय घेईल असे देखील सूचनक विधान त्यांनी केले आहे.
Amol Kolhe: बारामतीत रंगला 'तुतारी'चा वाद! पराभव दिसत असल्यानेच महायुतीकडून रडीचा डाव; अमोल कोल्हेंचा घणाघात
Amol Kolhe On Ajit pawarSaam Tv

लोकसभा निवडणूक निकालानंतर (Loksabha Election Result 2024) राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार नाराज झाले आहेत. हे नाराज आमदार घरवापसी करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. हे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या निवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे आणि काही नेत्यांच्या संपर्कात आहेत. याच मुद्द्यावर शिरूर लोकसभा मदारसंघाचे निवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'संघर्षाच्या काळात आले नाही, आता का येत आहेत.', असा सवाल अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटाच्या आमदारांना केला आहे.

साम टीव्हीशी संवाद साधताना अमोल कोल्हे यांनी सांगितले की, 'महाराष्ट्रातल्या जनतेनं कौल दिला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभेत मला लीड मिळालंय. जे आता परत येऊ पाहत आहेत पण आता जिंकल्यावर का? कार्यकर्त्यांनी जीवानं काम केलंय. संघर्षाच्या काळात आले नाही. आता का येत आहेत.', असा सवाल त्यांनी अजित पवार गटाच्या आमदारांना केला आहे.

Amol Kolhe: बारामतीत रंगला 'तुतारी'चा वाद! पराभव दिसत असल्यानेच महायुतीकडून रडीचा डाव; अमोल कोल्हेंचा घणाघात
Bhavana Gawali News: 'CM शिंदेंसह पक्षावर दबाव, अशा स्क्रिप्ट हिताच्या नसतात..' राजश्री पाटलांच्या पराभवानंतर भावना गवळी थेट बोलल्या!

तसंच, 'अजित पवार गटाचे कोणीच माझ्या संपर्कात नाही. ज्यांना यायचंय त्यांच्याबाबत पक्ष निर्णय घेईल.', असे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितले. दरम्यान, अमोल कोल्हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा दारुण पराभव केला. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाली. दोघांनीही एकमेकांवर जोरदार आरोप देखील केले.

Amol Kolhe: बारामतीत रंगला 'तुतारी'चा वाद! पराभव दिसत असल्यानेच महायुतीकडून रडीचा डाव; अमोल कोल्हेंचा घणाघात
Mumbai Hoarding Collapsed: मोठी बातमी! मुंबईमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळल्याची घटना; एक व्यक्ती गंभीर जखमी

या मतदारसंघातून विजयी व्हावे यासाठी अमोल कोल्हेंसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सभा घेतली होती. तर शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली होती. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. पण या मतदारसंघातील जनतेने खासदार म्हणून पुन्हा अमोल कोल्हे यांना पसंती दिली होती.

Amol Kolhe: बारामतीत रंगला 'तुतारी'चा वाद! पराभव दिसत असल्यानेच महायुतीकडून रडीचा डाव; अमोल कोल्हेंचा घणाघात
Mumbai Alert: अलर्ट! ४५ लाख मुंबईकरांना पावसाळ्यात पुराचा धोका, कारण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com