Sanjay Raut: 'डरपोक शिंदे सरकार, निवडणुका घेण्याची हिम्मत नाही', संजय राऊतांनी तोफ डागली; 'वन नेशन, वन इलेक्शन'वरुनही टीका

Sanjay Raut On Mumbai University Senate Election: वन नेशन वन नेशन इलेक्शनचा गाजावाजा करत असताना या निवडणूका घेण्याची हिंमत होत नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
Sanjay Raut: 'डरपोक शिंदे सरकार, निवडणुका घेण्याची हिम्मत नाही', संजय राऊतांनी तोफ डागली; 'वन नेशन, वन इलेक्शन'वरुनही टीका
Sanjay Raut On Mumbai University Senate Election:Saamtv
Published On

मयुर राणे, मुंबई|ता. २१ सप्टेंबर २०२४

Sanjay Raut On Mahayuti: दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट निवडणुका पार पडणार होत्या. मात्र, विद्यापीठाने पुन्हा एकदा मागील वेळेसारखंच रात्रीच्या वेळेस एक परिपत्रक काढून निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे. दुसऱ्यांचा मुंबई विद्यापीठाच्या निवडणूका रद्द झाल्याने राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. यावरुनच एकीकडे वन नेशन वन नेशन इलेक्शनचा गाजावाजा करत असताना या निवडणूका घेण्याची हिंमत होत नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"मुंबई विद्यापीठामध्ये हजारो विद्यार्थ्यांचा प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यापीठाला दिशा देणारा आणि विद्यापीठाच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावणारी सिनेट निवडणूक दुसऱ्यांदा पुढे ढकलली. आता निवडणुकीला दोन दिवस असताना ही निवडणूक पुढे ढकलण्याचे कारण काय? शिवसेना या निवडणुकीत पूर्ण ताकतीने उतरली आहे आणि सर्वच्या सर्व जागा या निवडणुकीतल्या शिवसेना जिंकत आहे हे दिसून आल्यावर डरपोक शिंदे सरकारने, डरपोक हा शब्द यासाठी वापरत आहे की त्यांना कोणत्याही निवडणुकीला सामोरे जाण्याचे हिंमत नाही हे सातत्याने पाहिले असेल," असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

तसेच "जिथे पैशाची मस्ती चालते तिथेच हे निवडणुकीला सामोरे जातात. पण हा सुशिक्षित तरुण वर्ग आहे हा इथे मतदान करतो आणि आपलं विद्यापीठ मुंबईची एक दिशादर्शक काम करतो हे निवडणूक आपण हरतो आहे हे लक्षात आल्यावर डरपोक शिंदे सरकारने ही निवडणूक दुसऱ्यांदा रद्द केली. या निवडणुका रद्द करून संपूर्ण पदवीधर तरुण वर्गात आणि रोज ओढून घेतला संताप ओढून घेतला," असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut: 'डरपोक शिंदे सरकार, निवडणुका घेण्याची हिम्मत नाही', संजय राऊतांनी तोफ डागली; 'वन नेशन, वन इलेक्शन'वरुनही टीका
Pune Crime: बुरखा घालून घरात शिरले अन् सपासप वार केले, मुलींच्या डोळ्यादेखत वडिलांची हत्या; पुणे हादरलं

"मला आश्चर्य वाटते नरेंद्र मोदी आणि त्यांच्या एकंदरीत कारभाराचे. लोकशाहीवर मोठी मोठी भाषणे करतात. एक देश एक निवडणूक या योजनेची ढोल वाजवतात पण आमच्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका घेण्यामध्ये त्यांची हिम्मत नाही पुन्हा रद्द झाली. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेण्याची हिंमत नाही मुंबई विद्यापीठाची निवडणूक घेण्याची हिंमत नाही तुम्ही कोणत्या निवडणुका घेणार आहात?" असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला.

Sanjay Raut: 'डरपोक शिंदे सरकार, निवडणुका घेण्याची हिम्मत नाही', संजय राऊतांनी तोफ डागली; 'वन नेशन, वन इलेक्शन'वरुनही टीका
Budgam Bus Accident Video: काश्मीरमध्ये पुन्हा भीषण दुर्घटना; BSF जवानांनी खचाखच भरलेली बस खोल दरीत कोसळली, ४ जणांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com