Sanjay Kakde: '...अशी परिस्थिती पाहून राजकारण सोडून द्यावंसं वाटतं'; संजय काकडे असं का म्हणाले?

Pune Lok Sabha: पुण्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. पवार कुटुंबाने निवडणुकीनंतर येईल, अशी ईच्छा यावेळी संजय काकडेंनी बोलताना व्यक्त केली आहे.
Pune Lok Sabha
Sanjay KakdeSaam Tv

पुण्यात लोकसभा (Pune Lok Sabha) निवडणुकीची धामधूम सुरु आहे. संजय काकडे हे प्रचारासाठी अजूनही मैदानात उतरलेले दिसून येत नाहीत. भाजपाने कोणत्याही पक्षात फूट पडली नाही. त्यांच्या पक्षातल्या त्या अंतर्गत गोष्टी आहेत. मी अजितदादांना मोठ्या भावासारखा मानतो, पवार साहेबांना देशातले ज्येष्ठ नेते मानतो. त्यांनी निवडणुकीनंतर एकत्र यावं असं मला मनापासून वाटतं, असं वक्तव्य संजय काकडे (Sanjay Kakde) यांनी केलं आहे.

राजकारणामध्ये कुणीच कुणाचा शत्रू नसतो. किंवा कुणी कुणाचा मित्र देखील नसतो. ११९७ पासुन पाहात आहे. पवार कुटुंब प्रत्येक दिवाळीला एकत्र राहणारं कुटुंब आज अशा थराला आलंय, त्यामुळे राजकारणाविषयी (Maharashtra election) असं पक्षात प्रवेश करणं, बाहेर येणं, ही दूर्मिळ गोष्ट आहे. गेली ५० वर्ष एकत्रित राहणारं कुटुंब वेगळं झालं, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत नव्हतं. एक कुटूंब वेगळं झाल्याचं पाहून चुकीच्या क्षेत्रात आलो की काय? असं वाटत असल्याचं संजय काकडे म्हणाले आहेत. एका कुटू्ंबाची अशी परिस्थिती पाहून राजकारण सोडून द्यावं वाटतं, असं संजय काकडे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

पवार कुटुंबाशी माझे चांगले संबंध आहेत. निवडणुकीनंतर सगळी कटुता बाजूला ठेऊन पवार कुटुंबाने एकत्र यावं, अशी ईच्छा संजय काकडे यांनी व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना भाजपने कोणतेही उमेदवार (Maharashtra politics) फोडलेले नाही. भाजप फोडाफोडीचं राजकारण करत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. काँग्रेसने पहिली आचारसंहिता तक्रार बीजेपी उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर केली आहे. राम मंदिराचे पोस्टर्स वाटले, त्यावर मोदींचा फोटो होता असा आक्षेप केला होता.

Pune Lok Sabha
Pune lok Sabha : मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसची आचारसंहिता भंगाची तक्रार

त्यावर प्रतिक्रिया देताना संजय काकडे म्हणाले की, राम मंदिर हे भारत जनता पक्षाच्या (BJP) फायद्यासाठी बांधलेलं नाहीये. हिंदूंच्या देशामध्ये हे मंदिर होणं गरजेचं आहे. भाजपाचे कोणतेही धोरण नाही की मंदिर दाखवून मतं मागायची, आम्ही केलेली कामं भरपूर आहेत असं वक्तव्य संजय काकडेंनी केलं आहे. पवार कुटुंबाने निवडणुकीनंतर येईल, अशी ईच्छा यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

Pune Lok Sabha
Pune Lok Sabha 2024: पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com