Pune News: 'कसब्या'तील उमेदवारीवरुन भाजपमध्ये चढाओढ! धीरज घाटेंची जोरदार फिल्डिंग; हेमंत रासनेंचे टेन्शन वाढले

Maharashtra Assembly Election 2024: एकीकडे विधानसभेसाठी हेमंत रासने इच्छुक असतानाच धीरज घाटेंनीही फिल्डिंग लावल्याने भाजपमध्येच अंतर्गत वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
Pune News: 'कसब्या'तील उमेदवारीवरुन भाजपमध्ये चढाओढ! धीरज घाटेंची जोरदार फिल्डिंग; हेमंत रासनेंचे टेन्शन वाढले
Maharashtra Assembly Election 2024: Saamtv
Published On

अक्षय बडवे, पुणे

राज्यातील विधानसभा निवडणुका येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी महायुती तसेच महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. विधानसभेच्या जागा वाटपावरुन घटक पक्षांमध्ये वादही रंगत असल्याचे दिसत आहे. अशातच आता पुण्यातील कसबा विधानसभेच्या जागेवरुन भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कसब्यातून भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.

Pune News: 'कसब्या'तील उमेदवारीवरुन भाजपमध्ये चढाओढ! धीरज घाटेंची जोरदार फिल्डिंग; हेमंत रासनेंचे टेन्शन वाढले
Maharashtra Politics: कॉन्फिडन्स वाढला! हरियाणाच्या विजयानं भाजप आक्रमक; राज्यातही पुन्हा महायुती सरकार? वाचा स्पेशल रिपोर्ट

पुण्यातील कसबा विधानसभेच्या जागेसाठी भारतीय जनता पक्षामध्येच चढाओढ पाहायला मिळत आहे. कसबा विधानसभा मतदार संघातून हेमंत रासणे उत्सुक आहेत. अशातच आता भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासाठी भाजपचे काही पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी कसब्यातून धीरज घाटे यांनाच उमेदवारी द्या, अशी मागणी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

मंगळवार (ता.८ ऑक्टोबर) कसबा विधानसभेच्या जागेसाठी पुण्यातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी धीरज घाटे यांच्या उमेदवारीची मागणी करण्यात आली. पोट निवडणुकीत हातातून निसटलेला आपला पारंपरिक मतदारसंघ भाजपा पुन्हा एकदा खेचून आणू शकतो, असा विश्वास या कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर बोलून दाखवला. त्यामुळे एकीकडे विधानसभेसाठी हेमंत रासने इच्छुक असतानाच धीरज घाटेंनीही फिल्डिंग लावल्याने भाजपमध्येच अंतर्गत वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

Pune News: 'कसब्या'तील उमेदवारीवरुन भाजपमध्ये चढाओढ! धीरज घाटेंची जोरदार फिल्डिंग; हेमंत रासनेंचे टेन्शन वाढले
Amravati Crime: एकाच तरुणावर दोघींचा जीव जडला! तरुणीने सपासप वार करुन दुसरीला संपवलं; बॉयफ्रेंडसाठी भयंकर कांड

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप नमते घेणार असून दोन्ही जिल्ह्यात भाजप फक्त 1 जागा लढवण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेंची शिवसेना चार, तर चिपळूणची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत यश मिळूनही भाजप एक पाऊल मागे जात असल्याने भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. नाराजीमुळे मैत्रीपूर्ण लढतींंचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Pune News: 'कसब्या'तील उमेदवारीवरुन भाजपमध्ये चढाओढ! धीरज घाटेंची जोरदार फिल्डिंग; हेमंत रासनेंचे टेन्शन वाढले
Buldhana Accident : बुलढाण्यात भीषण अपघात, भरधाव दुचाकी एसटी बसला धडकली; तिघांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com